दगडाचे ठेचून 30 वर्षीय युवकाची हत्या पोलिसांनी एकास घेतले तब्यात

दगडाचे ठेचून 30 वर्षीय युवकाची हत्या पोलिसांनी एकास घेतले तब्यात

जुने शहर पोलीस स्टेशन अनर्गत येणाऱ्या हिंगणा फाटा येथे आज दुपारी चारच्या दरम्यान एका 30 वर्षीय युवकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडल्याने एकाच खळबळ उडाली असून जुने शहर पोकिसनी या प्रकरणी एका संशिताला तब्यात घेतले आहे

जुने शहर पोलीस स्टेशन आतर्गत येणाऱ्या हिंगणा फाटा येथे आज दुपारी दगडाने ठेचून एका 30 वर्षीय युवकाची हत्या केल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले असता तेथे रक्ताच्या थारोळ्यात एक युवक मरून पडलेला दिसला जुने शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी ही बाबा आपल्या वरिष्ठाना कळविली असता अकोला जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शँकर शेळके ठेसे तज्ञ हे देखील आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले अधिक तपास केला असता सदर मरतक हा 30 वर्षीय शेख शाहरुख उर्फ फारुख राहणार सोनटक्के प्लॉट येथील रहिवासी असून आपल्याच परिचित व्यक्ती सोबत वाद होऊन हे हत्याकांड घडले असल्याची बाब सूत्रांकडून प्राप्त होत आहे. घटनेचे गंभीर्य पाहता जुने शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी त्वरित आपल्या कर्मचाऱ्यांसह सूत्र हलवण्यास सुरवात केली असता एका संशईत आरोपीस या घटने प्रकरणी अटक केली आहे. नेमकी हत्या का व कोणत्या कारणावरून झाली याचा तपास सुरु असून तपासा अंतीच काय ते या हत्येमागील रहस्य उलघडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news