स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ४१ मोटर सायकली जप्त! २५००,०००/- चा मुद्देमाल हस्तगत!

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ४१ मोटर सायकली जप्त! २५००,०००/- चा मुद्देमाल हस्तगत!

अकोला जिल्हयात मोटार सायकल चोरीचा घटना मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने पोलिस अधिक्षक श्री संदीप घुगे यांनी पो. नि. शंकर शेळके, स्थानीक गुन्हे शाखा अकोला यांना मोटार सायकल चोरीचे गुन्हे उपकीस आणण्याकरीता मार्गदर्शक सुचना दिल्या. त्या अनुशंगाने स्थानीक गुन्हे शाखा सहा पोलिस निरीक्षक कैलास भगत, पोउपनि मुकुंद देशमुख, गोपाल जाधव व त्याचे पथकातील अंमलदार यांना पो.स्टे. बाळापुर परीसरातील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आना मार्गदर्शन करून सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे पोउपनि गोपाल जाधव व पथकातील अंमलदार यांनी पो.स्टे. रामदास पेठ अप क ३०९/२०२३ कलम ३७९ भा.द.वि. गुन्हयाचा तांत्रीक व गोपानिय माहीतीचे आधारे तपास करून मुक्ताई नगर जि.जळगाव परीसरातुन संशयावरून मेहराजशाह मुसाशाह, वय ३२ वर्षे, रा. वरणगांव ता. भुसावळ, जि. जळगाव यास ताब्यात घेवुन विश्वासात घेवुन गुन्हया बाबत कौशल्य पूर्वक विचारपुस केली असता नमुद आरोपीने अकोला शहर, बाळापूर, खामगाव, मलकापुर शहर, बुलढाणा शहर, अंमळनेर, जि. जळगाव येथून एकूण १३ होन्डा शाईनमोटर सायकली चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी मेहराजशाह मुसाशाह, वय ३२ वर्ष राहणार वरणगांव ता. भुसावळ, जि. जळगांव यांचे जवळुन एकुण १३ मोटर सायकली जप्त केल्या.

तसेच स पो नि कैलास भगत व पथकातील अंमलदार यांनी पोलीस स्टेशन बाळापुर अ.नं. ४८४ / २१कलम ३७९ भा.द.वि. गुन्हयाचा तपास करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, आरोपी नामे त्रिलोक सोपीनाथ खंडेराव, वय २२वर्ष राहणार वार्ड नबंर २ भिमनगर, बुलढाणा, बाळापुर वाडेगांव परीसरात ब-याच चोरीच्या गाड्या विक्री केल्या आहेत. अशी माहीती मिळाल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा, अकोला येथील अधिकारी व अमलदार यांनी गोपनिय बातमीदाराचे माहीती वरून सापळा रचुन त्रिलोक सोपीनाथ खंडेराव यास ताब्यात घेवुन त्यास गुन्हया बाबत विश्वासात घेवुन विचारपुस केली असता नमुद आरोपी याने वेगवेगळ्या कंपनीचे एकूण २८ मोटर सायकली पातुर बाळापुर यानी परीसरातून चोरी केल्याची कबुली दिल्याने आरोपी नामे त्रिलोक सोपीनाथ खंडेराव याचे जवळुन एकूण २८ मोटर सायकली जप्त केल्या.

पो. नि. शंकर शेळके स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी व त्यांचे पथकातील अधिकारी व अमलदार यांगी मोटर सायकल चोरी करणा-या टोळी चा पर्दाफाश करून मोटर सायकल चोरी करणारे आरोपी १) मेहराजशाह मुसाशाह, वय ३२ वर्षे, रा. वरणगांव ता. भुसावळ, जि. जळगाव २) नामे त्रिलोक सोपीनाथ डेराव, वय रवर्च, राहणार वार्ड नंबर २ भिमनगर, बुलढाणा या दोघांना अटक करून त्याचे जवळुन आता पर्यंतच्या कारवाई मध्ये सर्वात जास्त ४१ मोटर सायकली एकुण किमंत अंदाजे २५,००,०००/-च्या मीटर सायकली जप्त करून पोलीस स्टेशन रामदासपेठ, सिव्हील लाईन, चान्नी, बाळापुर, तसेच बुलढाणा,

जळगांव जिल्हयातील मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. गाडीच्या चेवीस नंबर वरून ख-या मालकाचे नाव निष्पन्न करून दाखल असलेल्या गुन्हयांची माहीती घेण्याची कार्यवाही सुरू आहे. गुन्हयातील ०१ आरोपी पो.स्टे. रामदासपेठ व दुसरा आरोपी पो.स्टे. बाळापुर यांचे ताब्यात पुढील तपासकामी देण्यात आले आहे.

सदर वी कारवाई ही पोलीस अधिक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधिक्षक, अभय होंगरे, यांचे मार्गदर्शनाखाली पो. नि. शंकर शेळके, सपोनि कैलास भगत, मुकुंद देशमुख, पोउपनि गोपाल जाधव, पोलीस अमलदार फिरोजखान, दशरथ बोस्कर, स्वप्निल चौधरी, खुशाल नेमाडे, धिरज वानखडे, गोकुळ चव्हाण लिलाधर खंडारे, अन्सार शेख, स्वप्निल खेडकर, उमेश पराये, आकाश मानकर, अभिषेक पाठक, दत्तात्र ढोरे, विशाल मोरे, अविनाश पाचपोर, अब्दुल माजिद, एजाज अहमद, रवि खंडारे, अमीर, अमोल दिपके, संतोष दाभाडे, महेद्र मलीये चालक ना. पो. कॉ. प्रशांत कमलाकर, प्रकाश लोखंडे स्थानिक गुन्हे शाखा, अकोला यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news