मेडशी येथे हर घर तिरंगा फडकावा सरपंच. शेख जमीर भाई शेख गनीभाई ग्रामपंचायत मेडशी
सोयल पठाण मालेगाव तालुका प्रतिनिधी
मालेगांव : – केंद्र शासनाच्या आदेशानुसार शहरातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर तीन दिवस तिरंगा फडकवावा असे आवाहन मेडशी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या आदेशानुसार या वर्षी सुध्दा “हर घर तिरंगा” हे अभियान राबविण्यात येत आहे.तेव्हा शहरातील सर्व नागरिकांनी आपापल्या घरावर दिनांक १३ /14/१५ आगष्ट या तीन दिवसां करिता ” तिरंगा फडकवा असे आवाहन मेडशी ग्रामपंचायत चे. सरपंच शेख जमीर भाई शेख गनीभाई. यांनी केले आहे मेडशी ग्रामपंचायत च्या वतीने स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज डौलाने फडकावा, यासाठी ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे यादरम्यान प्रत्येक घराघरावर प्रत्येक नागरिकांनी तिरंगा ध्वज फडकावा व मेडशी शहर तिरंगामय व्हावा याकरिता सर्व नागरिकांनी आणि परिवारांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे भारताच्या स्वातंत्र्याला 76 वर्षे पूर्ण होत असून त्या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेजत राहाव्यात,स्वातंत्र्यसंग्रामातील अज्ञात नायक,क्रांतीकारक,स्वातंत्र्यसंग्रामात घडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे तसेच स्वातंत्र्यासाठी पेटवलेली क्रांतीज्योत कायम तेजत राहावी व देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी या उद्देशाने क्रांतिकारी इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या वतीने “हर घर तिरंगा हर मन तिरंगा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. देशातील गावागावांतील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा याकरिता या उपक्रमामध्ये जनतेने सहभागी व्हावे याकरिता युवकांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे या उपक्रमात सहभागी होण्याचे व राष्ट्रध्वज संहितेचे नियम व अटीचे काटेकोर पालन करावे..
मेडशी शहरातील नागरिकांनी दि.13/ 14 /15. तीन दिवस स्वातंत्र्य अमृत महोत्सव निमित्त सर्वांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज लावावा परंतु त्याचवेळी ध्वजा चे पालन करून ध्वजाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे मत मेडशी चे सरपंच शेख जमीर भाई यांनी केले आहे.