श्रीराम सर्व श्रेष्ठ , केवळ नाव घेतल्याने होतो उद्धार श्री खाटूश्याम बाबा मंदीर श्रीमद भागवत कथेचे पुष्प चवथे
अकोला. भगवान नारायण यांच्या विविध अवतारांमध्ये श्रीराम अवतार सर्व श्रेष्ठ असून केवळ श्रीरामाचे नाव घेतल्याने भक्तांचा उद्धार होतो तर पापीचा सुध्दा उद्धार होतो याबाबत विविध दृष्टांत सांगताना चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून सुरू असलेल्या श्रीमद् भागवत कथेत चवथे पुष्प गुंफताना संगितले भगवान विष्णू, भगवान शंकर, पृथ्वी, शेषनाग, कैलाश पर्वत, रावण, यांच्यातील श्रेष्ठ त्वावर केलेली कथा सांगितली आणि सर्व भक्तांच्या मनामनात वसलेले श्रीराम सर्व श्रेष्ठ असल्याचे श्रीनितिनदेव महाराज यांनी आज रविवारी सांगितले.
पुरुषोततम मास निमित्ताने स्व कृपाशंकर मिश्रा यांच्या स्मरणार्थ स्थानिक खाटू श्याम मंदिर, अकोला येथे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून राजेश मिश्रा परिवार अकोला यांच्या वतीने आयोजित श्री खाटूश्याम बाबा मंदीर अकोला येथे आज रविवारी भागवत कथेचे चवथे पुष्प गुंफताना नितिनदेव महाराज यांनी भा ग व त या चार शंब्दाचा अर्थ विषद केला आणि वामन अवतार आणि श्रीराम अवतार तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सव कथा तसेच देवांच्या श्रेष्ठत्वा बाबत विविध दृष्टांत सांगितले आज देव दर्शन मिळविण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात मात्र देव दर्शन मिळविण्याची ताकद नाम जप आणि कीर्तनात आहे देव नाम जप करण्यासाठीं भक्त अजिमलकुमार यांनी आपल्या पुत्राचे नाव नारायण ठेवले होते आणि संकटात सापडले असताना त्यांनी मदतीला आपला पुत्र नारायण चा धावा केला असता भगवान विष्णू यांचे 4दुत प्रकट होऊन त्यांनी यमदुताना परत पाठवले असल्याची जाणीव भक्त अजिमल कुमार ला झाल्यानंतर त्यांनी आपल्या पुत्राचे नाव नारायण ठेवले असल्याने पुत्राला मदतीला बोलावले होते एवढी शक्ती नामजप आहे तर प्रत्यक्ष नारायणाचा धावा केला असता तर साक्षात परमेश्वर स्वतः येऊन त्यांनी दर्शन दिले असते अशी धारणा भक्त अजीमलकुमार यांनी व्यक्त केली होती .
भक्ताची खरी श्रद्धा आवश्यक आहे अश्या भक्तांना देव स्वतः दर्शन देतात असे विवीध दृष्टांत देऊन सांगितले या भागवत कथेत दररोज आयोजक व भाविक भक्तांच्या वतीने विवीध धार्मिक जिवंत देखावे सादर करण्यात येत आहेत कथेच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा देखावा तर काल शुक्रवारी शंकर पार्वती यांचा देखावा उभा करण्यात आला होता कथेच्या तिसऱ्या दिवशी हिरण्या कश्यप, भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हाद यांचा देखावा उभा करण्यात आला होता आज चवथ्या दिवशी वामन, वासुदेव, यशोदा आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव जिवंत देखावा उभा करण्यात आला होता भागवत कथेची वेळ दुपारी 2 ते 6 अशी ठेवण्यात आली आहे.या कथेला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमद भागवत कथा आयोजक मिश्रा परीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे ही भागवत कथा यशस्वी करण्यासाठी अरुण शर्मा, नितिन मिश्रा, सूरज भिंडा, दिनेश श्रीवास, दिपक अग्रवाल, अनिल भुटियानी गोपाल लव्हाले, गणेश बुंदेले, पिंटू मिश्रा हे आपली सेवा देत आहेत तर मंच संचलन महेन्द्र जोशी करत आहेत