श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय ग्रंथालयात डॉ. एस आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

श्रीमती ल.रा.तो. वाणिज्य महाविद्यालय ग्रंथालयात डॉ. एस आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

स्थानिक : श्रीमती ल.रा.तो वाणिज्य महाविद्यालय ग्रंथालय विभागाच्या वतीने दिनांक 12 ऑगस्ट रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर. डी. सिकची यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक पद्मश्री डॉ.एस.आर. रंगनाथन यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख उपस्थिती म्हणून दि.बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष ॲड.मोतीसिंह मोहता यांच्या शुभहस्ते पद्मश्री डॉ.एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला हारार्पण करण्यात आले. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष इंजिनिअर श्री.अभिजीत परांजपे, मानद सचिव श्री. पवन माहेश्वरी, सह-सचिव सी.ए. विक्रम गोलेच्छा उपस्थित होते. आपले मनोगत व्यक्त करतांना महाविद्यालयाचे माजी ग्रंथपाल डॉ. एस.आर. बाहेती यांनी डॉ. रंगनाथन यांची ग्रंथालय बद्दलची भूमिका स्पष्ट करून, त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. ग्रंथालयात उपलब्ध वाचन साहित्य जसे स्पर्धा परीक्षा,व्यक्तिमत्व विकास, मानवी हक्क, मराठी कथा, कादंबरी, साहित्य, समीक्षा, बँकिंग फायनान्स, व्यवस्थापन, संदर्भ ग्रंथ, डॉ.रंगनाथन यांच्या जीवनावर आधारित ग्रंथ तसेच अनेक वाचनीय मासिके इत्यादींचा विशेष संग्रह ग्रंथालयात उपलब्ध असल्याचे वाचन वाचकांनी केले पाहिजेत असे आव्हान सुद्धा डॉ. बाहेती यांनी उपस्थितांना केले. कार्यक्रमाला वरिष्ठ महाविद्यालय ग्रंथालय समितीचे सदस्य डॉ.जी.जी. गोंडाणे, डॉ.वर्षा सुखदेवे, डॉ.टी.जी. मिर्गे, डॉ.ज्योती लाहोटी तसेच कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रंथपाल, प्रा.प्रशांत शिरसाट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता ग्रंथालयातील कर्मचारी श्री.जयकुमार तेलगोटे, श्री.कृष्णा सोनवणे, कु.कविता भामोद्रे, श्री.योगेश पवार, सौ सुनीता सरोदे, सौ. मृणाल कुलकर्णी यांनी अथक प्रयत्न केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news