ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महानगरात काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची तयारी प्रारंभ

ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत महानगरात काँग्रेसची लोकसभा निवडणुकीची तयारी प्रारंभ

 

अकोला- येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी अकोला लोकसभा मतदारसंघात रविवारी संपन्न झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा पदाधिकारी बैठकीच्या निमित्ताने प्रारंभ करण्यात आली.स्थानिक सेंट्रल प्लाझा सभागृहात रविवारी संपन्न झालेल्या अकोला शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या लोकसभा चाचपणी कार्यकर्ता बैठकीत काँग्रेसचे अकोला लोकसभा निवडणूक प्रभारी व प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष नानाभाऊ गावंडे, लोकसभा निवडणुकीचे संयोजक,ज्येष्ठ नेते श्यामभाऊ उमाळकर यांच्या मार्गदर्शनात व लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या संपूर्ण नेते मंडळींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाली.या बैठकीत नानाभाऊ गावंडे यांनी उपस्थित काँग्रेस पदाधिकारी व सर्व फ्रंटल पदाधिकाऱ्यांच्या सूचना व मनोगत जाणून घेतले. या लोकसभा निवडणूक चाचपणी बैठकीत अनेकांनी आपली मते व्यक्त करीत राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसला आलेले सुगीचे दिवस बघता या लोकसभा निवडणुकीत अकोला लोकसभा मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत काबीज करण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. नानाभाऊ गावंडे यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या बैठकीत महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे,जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर,प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी प्रकाश तायडे, प्रशांत गावंडे, माजी महापौर मदन भरगड, डॉ अभय पाटील, विवेक पारस्कर, माजी मंत्री अजहर हुसेन, माझी आ नातिकोद्दीन खतिब, माजी आ बबनराव चौधरी, मनपा विरोधी पक्षनेते साजिद खान पठाण, डॉ सुभाष कोरपे, मोहम्मद बदृजमा, एनएसयुआय चे नेते आकाश कवडे, सेवा दलाचे विजय शर्मा,इंटक नेते

प्रदीप वखारिया,काँग्रेस प्रवक्ते डॉ सुधीर ढोणे,

माझी जि प सदस्य आलमभाई,महानगर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पुष्पाताई देशमुख, प्रा संजय बोडके आदि उपस्थित होते.कार्यक्रमात अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करीत अनेक सूचना मांडल्यात. यात सहा महिन्यात पाहिजे तेवढे काम करून जनतेचा फीडबॅक मिळवणे, भाजप विषयी जनतेत असलेल्या असंतोषाच्या संदर्भात काँग्रेसच्या ध्येयधोरणांचा जनतेत पुरस्कार करणे, लोकसभेचा उमेदवार हा कार्यकर्ताच असणे, एक संघाने निवडणुकीला सामोरे जाणे,स्वछ,प्रामाणिक कार्यकर्ता उमेदवार देणे, मागासवर्गीय मतदारांच्या संदर्भात अभियान राबवणे, नव्या उमेदवाराला प्रतिनिधित्व देणे,काँग्रेससाठी मतदानाची टक्केवारी वाढविणे, पक्षाच्या फ्रंटल उमेदवारीचा विचार करणे, सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोग करणे, महाविकास आघाडीला सोबत घेणे,महिलांना प्राधान्य देणे आदी विषयावर अनेकांनी आपली मते मांडून विचार व्यक्त केलेत.आपल्या अध्यक्षीय मनोगतात नानाभाऊ गावंडे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.देशात भाजप प्रती असणारी उदासीनता व अंटीइन्कम्बसी लक्षात घेता अकोला मतदारसंघातील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विविध माध्यमातून पक्षीय अभियान राबवून लोकसभेच्या निवडणुकीला नव्या दृष्टीने सामोरे जाण्याचे आवाहन केले.पक्षाच्या दृष्टीने लोकसभा मतदारसंघातील वातावरण पोषक असून त्यात आता कठोर परिश्रमाची गरज आहे. नव्या जोमाने मतदारांना सामोरे जाऊन अकोला लोकसभा मतदार संघावर काँगेसचा झेंडा फदकविण्यासाठी पदाधिकारी वर्गाने कामाला लागण्याचे आवाहन गावंडे यांनी याप्रसंगी केले.श्यामभाऊ उमाळकर यांनी ही प्रास्तविक करीत मार्गदर्शन केले.संचालन मागासवर्गीय काँग्रेसचे नेते महेंद्र गवई यांनी तर आभार सेवादलाचे तस्वर पटेल यांनी मानलेत. यावेळी माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, कपिल रावदेव, चंद्रशेखर चिंचवडकर, दिनेश शुक्ला,अविनाश देशमुख, डॉ जीशान हुसेन,इस्माईल टीव्हीवाले,तपसू मानकीकर, विजय देशमुख, मनीष हिवराळे, मोहम्मद युसूफ,डॉ फैयाज अन्सारी, विठ्ठलराव मोहिते, अर्जुन थानवी,एड महेश गणगणे, जयकुमार वाटुरकर, प्रशांत प्रधान, वैभव सरनाईक, भूषण ताले, गणेश कळसकर,जमीरभाई बर्तनवाले, आकाश शिरसाट, सावजी, ढोरे, गणेश कळसकर, संजय मेश्रमकर, आबीद खान,ओम खंडारे समवेत जिल्हा व महानगर काँग्रेसचे पदाधिकारी तथा सर्व फ्रंटलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news