महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनपा समोर साखळी उपोषण!


प्रभाग क. ८ मधील आर. पी. टी. एस. ते शंकर मार्गे यांच्या घरापर्यंत रस्ता बनवण्याकरिता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने साखळी उपोषणास प्रारंभ.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांच्या नेतृत्वात आर.पी.टी.एस रस्त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे साखळी उपोषण प्रभाग क्र. ८ मधील आर.पी.टी.एस. ते शंकर मार्गे यांच्या घरापर्यंतचा रस्ता आजपर्यंत बनला नाही. स्थानिक आमदार गोवर्धनजी शर्मा यांच्या निधीतून हा रस्ता मंजूर देखील झाला आहे. संबंधित कंत्राटदार रस्ता तयार करण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर चालणाऱ्यांचे फार हाल होत आहेत. या रस्त्याने पायदळ चालणे सुद्धा कठीण झाले आहे. प्रभाग क्रमांक आठ मधील नागरिकांना दवाखान्यातील पेशंट, गर्भवती स्त्रिया, शाळकरी मुले यांना सदर रस्ता नसल्यामुळे फार हाल सहन करावे लागत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दिनांक ०५. ऑगस्ट या परिसरातील नागरिकांनी मनपा आयुक्त यांना उपोषणास बसण्याचे निवेदन दिले होते. परंतु त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यामुळे आज दिनांक १४ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ११ वाजता पासून प्रभाग क्र. ८ मधील सर्व नागरिक व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते या भागातील तसेच नागरिक महानगरपालिके समोर साखळी उपोषणास बसले आहेत.जो पर्यंत या रस्त्याबाबत ठोस कारवाई होणार नाही तो पर्यंत साखळी उपोषणास सुरू राहणार असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेश काळे यांनी सांगितले. या साखळी उपोषणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पंकज साबळे. शेखर पोटदुखे. राजेंद्र पिंजरकर. रुपेश तायडे. कुणाल निधाने. संजय दुधे. अविनाश मेहकर. प्रेम पाटील. नाना बोरकर. यांच्यासह प्रभाग क्रमांक आठ मधील महिला व नागरिक मोठ्या संख्येने साखळी उपोषणास बसले आहेत.