निष्पाप तरुणीच्या मृत्यू आणि टोइंग पथकाच्या मनमानी विरोधात संतप्त वंचित बहुजन युवा आघाडीचे ‘जवाब दो’ आंदोलन
अकोला दि. १४ – अकोला शहरातील शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या मनमानी कारभाराने परिसीमा गाठली. यामध्ये निष्पाप तरुणीच्या मृत्यू आणि टोइंग पथकाच्या मनमानी विरोधात संतप्त वंचित बहुजन युवा आघाडीने आज थेट वाहतूक निरीक्षक ह्यांना धारेवर धरून कारभार सुधारण्याची तंबी दिली.मृत तरुणीच्या अपघात प्रकरणी जबाबदार पोलीस, पुल बांधणारे कंत्राटदार आणि बांधकाम विभाग विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
अकोला शहरात उड्डाणपुलावर एका निष्पाप तरुणीला रस्ते अपघातात जीव गमवावा लागला.त्यापुलावर वाहतूक पोलिस केवळ चालान आणि वसुली करण्यात मग्न असतात.अपघात होवून देखील पुलावर सुरक्षा उपाय योजना करण्यात आलेला नसल्याने वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे ह्यांनी वाहतूक निरीक्षक ह्यांना धारेवर धरले.
त्याच बरोबर शहरात सुरू असलेली अवैध वाहतूक व टोईंग पथकाची दादागिरी, पार्किंग व्यवस्था नसताना आणि कुठलेही नियम ना पाळता नागरिकांच्या गाड्या उचलणे, अवैध शुल्क वसुली विरोधात युवा आघाडीचे पदाधिकारी आक्रमक झाले होते.वंचित बहुजन युवा आघाडी च्या वतीने वाहतूक पोलिसांच्या मनमानी व अवैध पैसा वसुली बंद करून टोइंग पथकाने लाऊडस्पिकवर तीनदा गाड्या काढण्याची सूचना करण्यासाठी मोठा लाऊडस्पिकरवर घोषणा करण्याची व पथकाला गणवेश व ओळखपत्र देण्याची मागणी करण्यात आली.
ह्या वेळी युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ पातोडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा पदाधिकारी श्रीकांत घोगरे युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष, राजकुमार दामोदर जिल्हा महासचिव,महानगर पूर्व अध्यक्ष शंकरराव इंगळे, पूर्व युवा अध्यक्ष जय तायडे व युवा पदाधिकारी ह्यांनी शहर वाहतूक नियंत्रण शाखा कार्यालय गाठुन
प्रश्नांची सरबत्ती केली.
तरुण मुलीचा फ्लायओव्हर वरील अपघाताला जबाबदार कोण…..?
फ्लायओव्हर बांधकाम ठेकेदार झांडु कंपनी, अभियंता, ट्राफीक कंट्रोल चे कॉन्स्टेबल यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करुन अपघात प्रवरण ठरलेल्या फ्लायओव्हर वरील अपघात रोखण्यासाठी तात्काळ
उपाययोजना कराव्या.
टोईंग पथक ठेकेदार आणि पोलिस अधीक्षक यांच्या मध्ये टोईंग संदर्भात नियम व अटींचा करारनाम्याचा अभ्यास करा असा सल्ला युवा प्रदेश महासचिव राजेंद्रभाऊ यांनी किनगे यांना दिला. नो पार्किंग मधील गाडी उचलण्यापुर्वी ३ वेळा भोंग्यावर सुचना करणे असताना तसेच गाड्या उचलल्या जातात ही दादागिरी युवा आघाडी खपवुन घेणार नाही. यात सुधारणा झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी युवा आघाडी ने पि.आय. सुनील किनगे यांना दिला. यावेळी मीडिया प्रमुख प्रशिक मोरे, संतोष गवई,मिनल ताई मेंढे, आदित्य इंगळे, आनंद खंडारे, कृष्णा देवकुणबी, सचिन शिराळे, करणं वानखडे, आकाश जंजाळ, आकाश गवई , वैभव खडसे ,शेखर इंगळे, सुजित तेलगोटे, श्याम देशमुख , राजेश बोदडे , साहिल आठवले, आशिष सोनोने, शिरीष ओव्हाळ,विजय बोदळे, सागर डोंगरे , सुमित शिरसाट, लवेश वरघट,रोहित खिल्लारे, शशिकांत उबरहांडे, धम्मपाल भगत, धीरज अंभोरे, अभिषेक खोंड इत्यादी
प्रामुख्याने उपस्थित होते.