श्री खाटूश्याम बाबा मंदीर श्रीमद भागवत कथेचे पुष्प सहावे भाविकांची संख्या मोठया संख्येने वाढली

श्री खाटूश्याम बाबा मंदीर श्रीमद भागवत कथेचे पुष्प सहावे भाविकांची संख्या मोठया संख्येने वाढली

उद्या होणार पूर्णाहुती, संध्याकाळी महाप्रसाद

अकोला. पुरुषोततम मास निमित्ताने स्व कृपाशंकर मिश्रा यांच्या स्मरणार्थ स्थानिक खाटू श्याम मंदिर, अकोला येथे 10 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रकूट धाम येथिल नितिनदेव महाराज यांच्या ओजस्वी वाणीतून राजेश मिश्रा परिवार अकोला यांच्या वतीने आयोजित श्री खाटूश्याम बाबा मंदीर अकोला येथे आज मंगळवारी भागवत कथेचे सहावे पुष्प गुंफताना नितिनदेव महाराज यांनी आज मंगळवारी श्रीकृष्ण रासलीला विस्तारपूर्वक सांगताना श्रीकृष्ण रासलीला मध्ये पुर्व जन्मातील संत आणि सर्व देव सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत असताना भगवान भोले हे श्रीकृष्णाची बासरी बनून आले त्यामुळें मथुरा वृंदावन मधील गोपिका यांना ईर्षा होत होती कारण श्रीकृष्ण बासरीला ओठाशी लावुन मधुर आणि गोड आवाजात सगळ्यांना वश करते यामुळे गोपिका यांना ईर्षा होत होती त्याच बासरी प्रमाणे आपण सर्वांनी वागण्याचा प्रयत्न केला तर दैंनदिन जीवनात बोलण्याची गरज पडली तर कमी बोला मात्र गोड बोला कुणाचेही मन दुखावणार नाही याची काळजी घ्या असे वागल्याने उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही असा उपदेश आज नितिनदेव महाराज यांनी केला.

आज स्वातंत्र्यदिन असल्याने सर्व शासकिय, निम शासकीय कार्यालयांना सुटी असल्याने श्रीमद भागवत कथा ऐकण्यासाठी भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे भागवत कथेत दररोज आयोजक व भाविक भक्तांच्या वतीने विवीध धार्मिक जिवंत देखावे सादर करण्यात येत आहेत कथेच्या पहिल्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा देखावा नंतर शंकर पार्वती यांचा देखावा, हिरण्या कश्यप, भगवान नृसिंह आणि भक्त प्रल्हाद वामन, वासुदेव, यशोदा आणि श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि माखन चोरी,गोवर्धन पर्वत,आज मंगळवारी रुखमनीं विवाहाचा जिवंत देखावा उभा करण्यात आला होता भागवत कथेची वेळ दुपारी 2 ते 6 अशी ठेवण्यात आली आहे.या कथेला जास्तीत जास्त भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीमद भागवत कथा आयोजक मिश्रा परीवार यांच्या वतीने करण्यात आले आहे उद्या दिनांक १६ऑगस्ट रोजी या श्रीमद भागवत कथेची पूर्णाहुती होत असल्याने कथा सकाळी ९वाजता सुरू करण्यात येणारं असून कथे नंतर पूर्णाहुती होईल व त्यानंतर संध्याकाळी महाप्रसाद होणार आहे भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे ही भागवत कथा यशस्वी करण्यासाठी अरुण शर्मा, नितिन मिश्रा, सूरज भिंडा, दिनेश श्रीवास, दिपक अग्रवाल, अनिल भुटियानी गोपाल लव्हाले, गणेश बुंदेले, पिंटू मिश्रा हे आपली सेवा देत आहेत तर मंचसंचलन महेन्द्र जोशी करत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news