अकोला पोलिस दलात एक दुःखत घटना घडली आहे. जुने शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या गीता नगर भागात एका महिला पोलीस कर्मचारीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. वृषाली दादाराव स्वर्गे (वय ३५) असं महिला पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. त्यांनी गीता नगरमधील एका अपार्टमेंटमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार मृतक महिला पोलीस यांच्या पतीचे निधन झाले, त्यात मुलं-बाळ नव्हतं, आयुष्यात एकटीच राहिली, या आयुष्याला पूर्णपणे वैतागली, म्हणून आज ‘मी’ आपलं जीवन इथेचं संपवत आहे, अशाप्रकारे सुसाईड नोट लिहून वृषाली हिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून अकोला पोलीस दलात दुःखाचं वातावरण पसरलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुनेशहर पोलीस करत आहेत.