अकोट येथे महिलांनी काढली 21 भरण्याची कावड; अनेक युती आणि महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग
डीजे च्या तालावर तरुणाई धरला ठेका
अकोट
श्रावण मासाच्या पहिल्याच दिवशी अकोट येथील महिलांनी 21 भरण्याची कावड काढून जलाभिषेक केला. अकोट शहरातील शनिवार पुरा ते रामेश्वर मंदिर ते नंदीपेठ या मार्गे कावड काढण्यात आली होती. या कावळ मध्ये अनेक महिलांनी तसेच युवतींनी सहभाग घेतला होता.
श्रावण महिना मध्ये अकोट येते दरवर्षी चौथ्या सोमवारी कावळ उत्सव होत असतो. मात्र यावेळेस महिलांनी आगळे वेगळे करण्याचा निर्णय घेतला. श्रावण मासातील पहिल्याच दिवशी महिलांची कावड निघत असल्याने अनेक महिला युती यांनी मोठ्या हर्षवल्यासात सहभाग घेतला. डीजेच्या तालावर तरुणी आणि महिला यांनी ठेका धरला होता. ही कावड यात्रा शनिवारपुरा, वाल्मीक नगर, संभाजीनगर, शिवाजी कॉलेज मार्गे रामेश्वर मंदिर येथे जलाभिषेक केला. नंतर ही कावड नंदीपेठ मार्गे नंदिकेश्वर मंदिर येथे जलाभिषेक करून नंदीपेठ मार्गे ही कावळ शनिवार पुरा येते पोचली. या कावडमध्ये महिलांनी पिवळ्या साड्या परिधान केल्या होत्या. अकोट मध्ये महिलांची ही पहिलीच कावड असल्याने ही कावड पाहण्यासाठी अनेक भाविक भक्तांनी गर्दी केली होती. अनेक ठिकाणी रांगोळ्या, चहा, पाण्याचे सुद्धा वाटप केले होते. तसेच अनेक महिला भगिनी यांनी सुद्धा कावळ उत्सव चा आनंद घेत अनेकांनी सहभाग घेतला होता.