अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे माजी केंद्र नायक नजीर शेख राष्ट्रपती पदकाने सन्मानित
किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढा – अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे माजी केंद्र नायक श्री नजीर शेख यांना १५ ऑगस्ट रोजी अकोला जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक अभय डोंगरे यांच्या हस्ते राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले. नजीर शेख हे होमगार्ड विभागामध्ये 1987 मध्ये भरती झाले होते. त्यांना पहिली पदस्थापना अकोला येथे निदेशक म्हणून या पदावर नेमणूक दिली.सन २०१० गडचिरोली येथे सामुग्री प्रबंधक सुभेदार या पदावर पदोन्नती मिळाली,२०१३ मध्ये ठाणे येथे पलटण नायक या पदावर पदोन्नती मिळाली. सन २०१६ मध्ये अकोला येथे केंद्र नायक या पदावर पदोन्नती देण्यात आली.सन २०२०/३० एप्रिल रोजी अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालय येथे सेवानिवृत झाले.नजीर शेख यांनी होमगार्ड विभागात एकूण ३६ वर्षे संघटनेमध्ये कर्तव्य सेवा दिली. ठाणे येथे कर्तव्य करत असतांना २६ जानेवारी २०१५ मध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना आताचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते.व राष्ट्रपती पदकाची घोषणा करण्यात आली होती.आज १५ ऑगस्ट २०२३ रोजी अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयात केंद्र सरकारकडून राष्ट्रपतीपदक प्राप्त झाले. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या रोजी अकोला होमगार्ड कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हा समादेशक तथा अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या हस्ते महामहिम राष्ट्रपती यांचे गुणवत्तापूर्वक सेवा पदकाने नजीर शेख यांना सन्मानित करण्यात आले.यावेळी अकोला जिल्हा होमगार्ड कार्यालयाचे प्रशासकीय अधिकारी शहानवाज शेख, केंद्र नायक राजेश शेळके, सामुग्री प्रबंधक सुभेदार संतोषकुमार जयस्वाल, कनिष्ठ लिपिक अभिषेक देशमुख, अकोला प्रभारी तालुका समादेशक राजु खडसे,पलटण नायक प्रेम कुमार दामोदर, प.ना.अशोक इंगळे ,प.ना.दिपक सूर्यवंशी सह होमगार्ड महिला व पुरुष होमगार्ड उपस्थित होते.