महान येथील काटेपुर्णा धरणात पोहण्यासाठी गेलेल्या तीन युवकांपैकी एकाचा बुडुन मृत्यु.
पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाने रात्री चक्क दोन वाजता शोधुन काढला 15 वर्षिय युवकाचा मृतदेह
17 ऑगस्ट रोजी रात्री 12:30 वाजताच्या दरम्यान बार्शीटाकळी येथील पोलीस सांच्या सांगण्यावरून पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ यांनी मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना महान धरणात एक युवक बुडालेला असल्याची माहीती दीली आणी तात्काळ सर्च ऑपरेशन करिता पाचारण केले यावेळी जिवरक्षक दिपक सदाफळे यांनी क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी विष्णू केवट,शेखर केवट, यांना घेऊन घटनास्थळ घाठले अंदाजे 13 ते 15 वर्ष वयोगटातील तीन युवक हे महान येथील धरणात पोहण्यासाठी गेले होते. यामध्ये खिजर अहेमद शब्बीर अहेमद,सय्यद कौसेन सय्यद सलीम,रा.बार्शीटाकळी येथे पाहुणा आलेला म.दानीश म.आबीद रा.भातकुली जिल्हा अमरावती हे तीन मित्र महान येथील काटेपुर्णा धरणात पोहण्यासाठी गेले होते परंतु तीघांनाही पोहण येत नसल्याने आणी धरणात मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने खीजर अहेमद हा पाण्यात बेपत्ता झाला होता. सर्च ऑपरेशन करून 15 फूट पाण्यातून रात्री 2:30 वाजता धरणातील तळाशी असलेला खीजर अहेमदचा मृतदेह शोधून बाहेर काढला यावेळी पिंजर पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ सर,महान बीट चे दत्तात्रय चव्हाण साहेब, रायटर स्वप्नील बडगे साहेब, बार्शीटाकळी पोलिस ठाण्याचे हे.काॅ.भुषण मोरे साहेब,पो.काॅ. नागसेन वानखडे साहेब,पो.काॅ. अमित सुगंधी साहेब आणी बार्शीटाकळी येथील नातेवाईकांसह मोठया प्रमाणावर नागरीक उपस्थित होते अशी माहिती पथक प्रमुख दिपक सदाफळे यांनी दीली आहे.