स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव विविध कार्यक्रमाद्वारे जल्लोषात साजरा
मनोज भगत
तालुका प्रतिनिधी तेल्हारा
संपूर्ण देशात साजरा होत असलेला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होली फेथ इंग्लिश प्रायमरी स्कूल हीवरखेड मध्ये विविध कार्यक्रमाद्वारे आयोजित करण्यात आला सर्वप्रथम 13 ऑगस्ट अमृत महोत्सवाचा पहिला दिवस या दिवशी होलीफेथ स्कूलच्या मुख्याध्यापिका मॅडम कल्पना अस्वार मॅडम यांनी ध्वजारोहण केले त्यानंतर मेरी माटी मेरा देश हा उपक्रम प्रभावीपणे राबविला पंचप्राण शपथविधी घेऊन मिट्टी का दिया सोबतच वसुधावंदन करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला कार्यक्रमाला श्री गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गौतम इंगळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व पर्यावरणाविषयी महत्त्व सांगितले तसेच वालचाळे मॅडम यांनी सुद्धा मार्गदर्शन केले . सूत्रसंचालन शितल वानखडे मॅडम यांनी केले तर आभार शितल शेळके मॅडम यांनी केले सर्व शिक्षक वृंद आणि कर्मचारी वर्ग कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांनी सहकार्य केलं 14 ऑगस्ट रोजी अमृत महोत्सवाचा दुसरा दिवस या दिवशी स्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा घेऊन साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असलेले श्री गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम इंगळे सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा सोनवणे मॅडम यांनी केले तर आभार शितल वानखडे मॅडम यांनी केले. 15 ऑगस्ट अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला यावेळी देशाचे कार्यरत सैनिक एअरफोर्स मॅन श्री प्रतीक महादेवराव दाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून होलीफेथ स्कूलचे अध्यक्ष श्री जीवनरावजी देशमुख सर यांनी शाळेला डिजिटल वर्ग खोली उपलब्ध करून दिली तर डिजिटल वर्ग खोलीचे उद्घाटन श्री नंदकिशोर लाखोटिया सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच वीरो को वंदन आणि वसुधा वंदन घेण्यात आले.
त्यामध्ये सैनिक व त्याचे कुटुंबीय यांचा सत्कार करण्यात आला स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ अस्वार मॅडम यांनी केला तसेच कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले सेवानिवृत्त शिक्षक रमेश जी गिऱ्हे सर यांनी यावेळी पाच मुलं दत्तक घेण्याची घोषणा केली त्यानंतर सैनिक प्रतीक दाते यांनी सुद्धा पुढील वर्षी पाच विद्यार्थी दत्तक घेण्याचा मानस बाळगला त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण करण्यात आला यावेळी अतिथी म्हणून श्री निळकंठराव जी देशमुख सर पोलीस पाटील प्रकाशजी गावंडे सर डॉक्टर रामदास धुळे सर डॉक्टर दीपक तारापुरे सर डॉक्टर प्रशांत जी इंगळे सर वसीम मिर्झा सर गजानन महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम इंगळे सर अरुण रहाणे सर देवेंद्र राऊत सर माजी सैनिक भाऊदेरावजी का कांईगे सर महादेव दाते प्रमिलाताई दाते संतोष वालचाळे, जगन्नाथ महाकाळ सतीश इंगळे सुनील अस्वार मनोज भगत संजय राऊत गावातील ज्येष्ठ नागरिक पालक वर्ग व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका अस्वार मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन ममता इंगळे व शितल रेखाते मॅडम यांनी केले आभार शितल अग्रवाल मॅडम यांनी केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रिया वालचाळे मॅडम सीमा सोनवणे मॅडम सोनुबाई कुराडे मॅडम शितल वानखडे मॅडम पल्लवी फोप्से मॅडम शितल शेळके मॅडम ढेगेकर ताई वायकर ताई राजाराम भाऊ इंगळे तसेच भोपळे मॅडम अभिजीत तेलगोटे सर विशाल हागे सर चतुर्थी हागे मॅडम निखिल भड सर निकिता गवार गुरु मॅडम मनीष ताडे या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.