महामार्गावर मालवाहू ट्रकचा अमोरासमोर अपघातात एक ठार
वणी रंभापुर नजीकची घटना
संजय तायडे तालुका प्रतिनिधी बोरगाव मंजूर – राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीत वणी रंभापुर बस थांब्या नजीक दोन मालवाहू ट्रकच्या अमोरासमोर धडकेत एक जण ठार झाल्याची घटना १७ ऑगस्ट गुरुवारी दुपार दरम्यान घडली या अपघातात एक जण ठार झाला, मोहम्मद आमीर चालक असे मृतकाचे नाव आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मालवाहू ट्रक क्रमांक एम एच ४० बी एल ७९५६ मालवाहू ट्रक, मालवाहू ट्रक क्रमांक एम एच १२ क्यु डब्ल्यू ९५९८ या दोन वाहनात समोरासमोर जोरदार धडक झाली, दरम्यान अपघात एवढा भिषण होता की यातील मालवाहू ट्रक क्रमांक एम एच १२ क्यु डब्ल्यू ९५ ९८ चा चालक कॅबीन मध्ये अडकला होता, दरम्यान घटनेची माहिती बोरगाव मंजू पोलिसांना मिळाली वरुन ठाणेदार मनोज केदारे, वाहतूक पोलीस कर्मचारी गिरीश विर सह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने पोलिसांनी मालवाहू ट्रकच्या कॅबीन मध्ये अडकून पडलेल्या चालक मोहम्मद आमीर वय ४५ वर्ष राहणार कलीमोद्दीन ठाणे उत्तर प्रदेश यास कॅबीन तोडुन बाहेर काढून गंभीर जखमी झालेल्या चालकास उपचारासाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मोहम्मद आमीर याचा मृत्यू झाला, तर दुसरा मालवाहू ट्रक चा चालक राजेश सुरेश बंजारा वय ३८ राहणार शिवनी मध्यप्रदेश हा जखमी झाला, दरम्यान घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केला, वृत्त लिहिस्तोर पोलिस दप्तरी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.