स्वातंत्र्य दिनानिमित्त पातूर पोलीस स्टेशन व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनच्या वतीने वृक्षारोपण संपन्न…
पातूर प्रतिनिधी…
आज दि : 15 ऑगस्ट 2023 रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाचा उत्सव “आझादी का अमृत महोत्सव” म्हणून साजरा केला जातो.भारतीयांना एकजूट होऊन राष्ट्राला अग्रेसर ठेवून पुढे घेऊन जायचे आहे.देशाच्या विविध प्रकारच्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी सरकारने अनेक कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये मेरी माती मेरा देश अभियान सुरु करण्यात आले आहे.याच दिनाचे औचित्य साधून पातूर पोलीस स्टेशन येथे सकाळी ७ वाजता तिरंगा ध्वज फडकविण्यात आला.त्यानंतर पातूर पोलीस स्टेशन व महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन तसेच द प्रोफेशनल करिअर बहूउद्देशीय शैक्षणिक संस्था पातूर यांच्या संयुक्त विद्यमाने पातूर पोलीस स्टेशनच्या परिसरात व विविध सामाजिक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले.यावेळी पो.स्टे.ठाणेदार मा. किशोर शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक मीरा सोनुने, महिला पोलीस कर्मचारी नम्रता लाड यांच्या हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.तसेच पोलीस कॉन्स्टेबल, होमगार्ड कर्मचारी, महिला कर्मचारी उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशन चे जिल्हा अध्यक्ष अर्जुनसिंह गहिलोत, तालुका अध्यक्ष अविनाश पोहरे, युवती सदस्य कु.कोमल सुरवाडे, कु.सुवर्णा चव्हाण, कु.दिव्या वगरे, कु.लक्ष्मी कौलकर, फोटोग्राफर सतिश कांबळे, पवन सुरवाडे, आशिष शेगोकार आदी सदस्य उपस्थित होते.