डाबकी रोड वरील रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांचे होत आहेत हाल! अर्धे रेल्वे गेट चालू ठेवण्याची नागरिकांकडून मागणी!
पर्यायी मार्गावर पाऊस आल्यामुळे नागरिकांचे होत आहेत हाल!
अकोला शहरातील डाबकी रोड वरील रेल्वे गेट बंद असल्यामुळे नागरिकांचे हाल होत आहे. तर काही नागरिक डाबकी नाल्याच्या साह्याने दोन चाकी वाहन जात आहेत. मात्र आज आलेल्या पावसामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल सहन करावे लागत आहे. तर दुसरीकडे गळंकी मार्ग सुद्धा बंद आहे. आज आलेल्या पावसामुळे डाबकी नाल्यावरी कच्च्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाल्यामुळे टू व्हीलर वाहने स्लीप होऊन बरेच जण जखमी झाले आहेत.
रेल्वे विभागाकडून गेट नंबर3 जीए 18 ऑगस्ट ते 20ऑगस्ट पर्यंत संबंधित गेट सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत बंद राहणार असल्याचे फलक लावण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे.
तर दुसरीकडे नागरिकांकडून संबंधित गेट चे काम करायचे असेल तर अर्धे गेट हे चालू ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या रस्त्याने. विद्यार्थी वर्ग. रुग्ण या रस्त्याने येत असतात मात्र संबंधित गेट बंद असल्यामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.तसेच विद्यार्थी वर्गांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित गेटचे काम करायचे असल्यास अर्धे गेट चालू ठेवायचे मागणी नागरिकांकडून होत आहे.