अकोट शहरातील कावड पालखी उत्सव मंडळाची बैठक संपन्न!

अकोट शहरातील कावड पालखी उत्सव मंडळाची बैठक संपन्न!

पोलीस स्टेशन अकोट शहर सावली सभागृह मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. बैठकीला मा. उपविभागीय दंडाधिकारी श्री. अरखराव साहेब, मा. सहायक पोलीस अधिक्षक उपविभाग अकोट खोखर मॅडम, मा. मुख्याधिकारी श्री. नरेंद्र बरे नगर परीषद अकोट, महावितरण कार्यालयाचे कार्यकारी अभियंता श्री. अनसींगकर, शहर अभियंता श्री. प्रविण इंगळे, बस आगार प्रमुख श्री. भालतिलख, सार्वजनीक बांधकाम विभागाचे अधिकारी, दूरभाष केंद्र वे कर्मचारी, तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदा श्री. आत्राम, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामीण रुग्णालाचे अधिकारी यांचे उपस्थितीत पार पडली. बैठकी मध्ये कावड मिरवणुक मार्गातील अडी अडचणी, रस्तावरील खड्डे बुजविणे, विद्युत पोल सरळ करून विद्युत तारा उंचावणे, शहरातील स्वच्छता इ. विषयावर प्रशासनाने कावड पालखी शिवभक्त यांना उपाययोजना करण्याची ज्याली दिली, तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी अकोट यांनी कावड पालखी मंडळाचे पदाधिकारी यांना मिरवणुक वेळेवर काढून शांततेत पार पाडावी. तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखावी. ध्वनी प्रदुषण नियंत्रण व नियमण कायदयाचे पालन करावे. मिरवणुक मधील मंडळानी त्याचे लोकांवर नियंत्रण ठेवण्या करीता स्वंयसेवक नेमावेत. या बाबत सुचना देवून कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान केले. तसेच मंडळाचे अध्यक्ष यांनी रितसर प्रत्येकाने वेगवेगळी परवानागी मिळण्याचा अर्ज व वाद्य ध्वनी बाबत परवानागी मिळण्याचा अर्ज देवून परवाना घ्यावी. असे सुचना दिली. बैठकीला १०० ते १२५ कावड मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news