सनदी लेखापाल यांचे शेगाव येथे दोन दिवसीय उप प्रादेशिक संमेलन

सनदी लेखापाल यांचे शेगाव येथे दोन दिवसीय उप प्रादेशिक संमेलन
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची राहणार उपस्थिती,अनेक व्याख्यानांचे आयोजन

अकोला-सनदी लेखापाल विश्वाला बदलत्या आर्थिक घडामोडीची माहिती व्हावी, त्यांच्या व्यावसायिक व कॅरीयर विषयक ज्ञानात मोलाची भर पडावी, या विश्वातील कायदे व तांत्रिक घडामोडी त्यांना अवगत व्हाव्यात यासाठी आर्थिक विश्वाचा लेखाजोखा सांभाळणाऱ्या सनदी लेखापाल यांच्या दोन दिवसीय उपप्रादेशिक संमेलनाचे शेगाव येथे आयोजन करण्यात आले आहे. वेस्टर्न इंडिया रीजनल कौन्सिल दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अकोला व अमरावती शाखेच्या वतीने शुक्रवार दिनांक 25 व शनिवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालया च्या सभागृहात सनदी लेखापालांचे दोन दिवसीय उपप्रादेशिक संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ना.भागवत कराड यांची उपस्थिती लाभणार असून सनदी लेखापालांच्या असो.चे राष्ट्रीय अध्यक्ष समवेत ख्यातनाम वक्ते या दोन दिवशी संमेलनात उपस्थित राहणार असल्याची माहिती सनदी लेखापाल असो. अकोला शाखेच्या अध्यक्ष सीए सीमा बाहेती यांनी दिली. स्थानिय तोष्णीवाल लेआउट येथील असो.च्या कार्यालयात संपन्न झालेल्या पत्रकार परिषदेत या दोन दिवशीय  उपप्रादेशिक संमेलनाची माहिती देण्यात आली.अमरावती विभागातील समस्त सनदी लेखापालां साठी आयोजित या संमेलनाचा प्रारंभ शुक्रवार दिनांक
25 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता ना.कराड यांच्या हस्ते तथा सनदी लेखापाल संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए अनिकेत तलाठी, राष्ट्रीय उपाध्यक्ष सीए रणजीत अग्रवाल, आयोजन समितीतील सनदी लेखापालांच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष सीए अर्पित काबरा, पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष हितेश कोमल, सचिव सीए सौरभ अजमेरा, कोषाध्यक्ष सीए केतन सैया आदी  मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यानंतर तांत्रिक व्याख्यानांचा प्रारंभ करण्यात येऊन या व्याख्यानाचे पहिले पुष्प सीए सुनील गभावाला हे गुंफणार असून जीएसटी संदर्भातील लवाद कसा हाताळावा यावर ते व्याख्यान सादर करणार आहेत. दुपारी 2 वाजता  सनदी लेखापाल संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीए निलेश विकमसे हे सीए व्यवसाया चे वर्तमान चित्र जागतिक संधी व नवीन टप्पे यावर व्याख्यान सादर करणार आहेत. तिसरे सत्र दुपारी 3 वाजता सीए विमल पुनमिया हे गुंफणार असून ते इच्छापत्राचे स्वरूप तथा वारसदार या विषयावर आपले व्याख्यान सादर करणार आहेत. या उपप्रादेशिक संमेलनात सहभागी होणाऱ्या सनदी लेखापालांना आनंद सागर  बघण्याची सोय आयोजन समितीच्या वतीने करण्यात आली असून रात्री कवी संमेलनाचे ही आयोजन संमेलन स्थळी करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. शनिवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी  सकाळी 7-30 वाजता से
संमेलनात सहभागी सनदी लेखापालांना संत गजानन महाराज मंदिराचे दर्शन घडविण्यात येणार आहे.या नंतर सकाळी 10 वाजता पुन्हा तांत्रिक व्याख्यानांना प्रारंभ होणार आहे.द्वितीय दिनाच्या या व्याख्यानाचे प्रथम पुष्प डॉ सीए गिरीश आहुजा हे गुंफनार असून  भांडवली लाभांमधील गंभीर मुद्दे या विषयावर ते व्याख्यान सादर करणार आहेत. यानंतर सकाळी 11 वाजता सनदी लेखापाल संस्थेचे  माजी राष्ट्रीय अध्यक्ष सीए निहार जम्बुसरिया हे विश्वस्त संस्था यावर व्याख्यान सादर करणार आहेत.दुपारी 2 वाजता वित्तीय विश्वाला आध्यात्मिक कोंदण बसवण्यासाठी भक्तिमय  व्याख्यान होणार आहे. या भक्तिमय व्याख्यानात स्वामी श्री गोविंददेव गिरी महाराज हे भारतीय संस्कृतीमध्ये व्यवस्थापन शास्त्र या विषयावर आपले व्याख्यान सादर करणार आहेत. यानंतर दुपारी 3-30 वाजता  भांडवली बाजार या विषयावर सनदी लेखापालांचे सामूहिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. पश्चिम विदर्भातील शेगाव येथे प्रथमच होत असलेल्या या उपप्रादेशिक  सनदी लेखापाल संमेलनात उपविभागातील सनदी लेखापाल यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. हे दोन दिवशीय संमेलन यशस्वी करण्यासाठी सनदी लेखापाल असो.अकोला शाखेच्या अध्यक्षा सीए सीमा बाहेती, अमरावती शाखेचे अध्यक्ष सीए विष्णुकांत सोनी,अकोला शाखेचे उपाध्यक्ष सीए पंकज लदनिया, सचिव सीए सुमित आलिमचंदानी, कोषाध्यक्ष सीए भूषण जाजू, कार्यकारी सदस्य सीए नवीन कृपलानी,माजी अध्यक्ष सीए हिरेण जोगी, तथा अमरावती शाखेच्या उपाध्यक्ष सीए अनुपमा लड्डा, सचिव सीए साकेत मेहता, कोषाध्यक्ष सीए दिव्या त्रिपोटी, विद्यार्थी शाखेचे अध्यक्ष मधुर झंवर, कार्यकारी सदस्य पवन जाजू समवेत समस्त पदाधिकारी मेहनत करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news