विज्ञान शिक्षकांचा विज्ञान अभ्यास दौरा हैदराबाद यशस्वी

विज्ञान शिक्षकांचा विज्ञान अभ्यास दौरा हैदराबाद यशस्वी

माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांचा प्रेरणादायी उपक्रम

विज्ञानाच्या विविध शाखांचा शिक्षकांनी केला अभ्यास

किरण कुमार निमकंडे सह निखिल इंगळे पातूर शहर प्रतिनिधी सत्य लढापातूर : केवळ पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास घडवणे हे शिक्षकांसमोर आव्हान आहे विज्ञानाच्या माध्यमातून बदलत्या युगाची स्पर्धा करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे शिक्षकांना शिक्षण व आधुनिक बदलाची मोट बांधता यावी यासाठी अल्पावधीतच शिक्षण क्षेत्रात आपली छाप उमटवणाऱ्या नवोपक्रमशील शिक्षणाधिकारी डॉक्टर सुचिता पाटेकर व अकोला जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाने पातुर तालुक्यासह जिल्ह्यातील मुख्याध्यापक,विज्ञान व गणित शिक्षकांचा विज्ञान अभ्यास दौरा हैदराबाद येथे आयोजित केला होता या अभ्यास दौऱ्यामध्ये 60 शिक्षकांचा सहभाग होता.
या अभ्यास दौऱ्यामधून विज्ञानाच्या माध्यमातून बुद्धी कौशल्य आणि नैपुण्य संपादन करून विज्ञान संशोधनाची दिशा आणि शिक्षकांची वैचारिक प्रगल्भता वाढवण्यासाठी व शैक्षणिक स्तर विज्ञानाच्या माध्यमातून बळकट करण्यासाठी हैदराबाद येथील राष्ट्रीय पोषण संस्था (NIN), बिर्ला सायन्स सेंटर अँड प्लॅनेटोरियम, भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषद( ICMR ), नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) च्या शास्त्रज्ञांनी जिल्ह्यातील शिक्षकांना समुपदेशन करून त्यांच्यामध्ये असणाऱ्या विज्ञान व खगोल विज्ञानासह, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र,जैविक शेती विषयातील उनिवा दूर करून शिक्षकांची विज्ञान विषयातील प्रगल्भता वाढवण्याचा या माध्यमातून प्रयत्न करण्यात आला. सोबतच इस्रोची शाखा असलेल्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर (NRSC) मध्ये चंद्रयान 3 ची उडान भरताना कोणते सेंसर काम करतात व फ्युएल कोणत्या पद्धतीने यानाला मिळते याबद्दल प्रात्यक्षिक शिक्षकांनी पाहिले, विज्ञान प्रदर्शनी ला भेट देऊन विविध प्रतिकृतींचा शिक्षकांनी अभ्यास केला त्यामुळे शिक्षकांचे विज्ञान, खगोल विज्ञान विषयातील शिक्षकांचे संबोध पक्के झाले. हा विज्ञान अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी बिर्ला सायन्स सेंटरचे शास्त्रज्ञ डॉक्टर विश्वनाथ गोगटे व डॉक्टर स्नेहा गोगटे यांचा सिंहाचा वाटा राहिला या अभ्यास दौऱ्याचा फायदा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची विज्ञान विषयाबद्दल आवड निर्माण करण्यासाठी व येणाऱ्या भविष्यात इन्स्पायर अवार्ड मिळवून देण्यासाठी नक्कीच होईल असा विश्वास जिल्हा परिषद शिक्षण विभाग व अकोला जिल्हा अध्यापक मंडळाला आहे.

——————–
अभ्यासक्रमा व पाठ्यक्रम एवढ्यावरच न थांबता विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं . यासाठी शिक्षकांना कृतीयुक्त अध्यापन पद्धती व झपाट्याने बदलत जाणाऱ्या विज्ञानाच्या विविध शाखाचा अभ्यास प्रत्यक्ष करता यावा व विज्ञान खगोल विज्ञान यासारख्या विज्ञानाच्या विविध शाखांच्या अभ्यासातुन शिक्षकांचे प्रगल्भता वाढावी यासाठी या अभ्यास दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. सुचिता पाटेकर शिक्षणाधिकारी ( प्राथ./माध्य.)
जिल्हा परिषद अकोला

——————–

जिल्ह्यातील विज्ञान शिक्षक, विज्ञान प्रेमी, विद्यार्थी यांना विज्ञानाच्या विविध शाखांचा अभ्यास घडवून आणण्यासाठी जिल्हा अध्यापक मंडळ सतत प्रयत्नशील असते त्याचाच एक भाग म्हणून विज्ञान अभ्यास दौरा हैदराबादचे आयोजन करण्यात आले होते.

डॉ. रवींद्र भास्कर
जिल्हाध्यक्ष विज्ञान अध्यापक मंडळ अकोला

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news