खडकी भागातील आनंद वाटिकेत घरफोडी!

खडकी भागातील आनंद वाटिकेत घरफोडी!

इकडे आड तिकडे विहीर आधीच नैसर्गिक संकटातून बचावलेल्या आनंद वाटिका परिसरातील नागरिकांवर पुन्हा एकदा संकट!

खदान पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नवीन सुसज्ज इमारती आनंद वाटिका परिसर येथे एक बंद घर फोडून अज्ञातांनी 20,000 रोख रकमे सह 50 हजारांचे एवज लंपास केला अज्ञात आरोपी विरुद्ध खदान पोलिसांनी घरपोडीचा गुन्हा दाखल केला आहे आनंद वाटिका निवासी शशांक महापुरे हे सहकुटुंब एका धार्मिक कार्यक्रमासाठी नाशिक येथे गेले असता त्यांचे घर बंद होते अज्ञात चोरट्यांनी पाळत ठेवत घर फोडी केली दरम्यान त्यांच्या घराचे गेट व दाराचे कुलपे तुटलेली आढळल्याने शेजाऱ्यांनी मोबाईल वरून हे बाब महापूरे यांना कळविले त्यांनी तत्काळ अकोला गाठून पाहणी केली असता घरामधील 20,000 रोख 14 ग्राम सोने 300 ग्राम चांदी असा एकूण 50 हजारांचा मुद्देमाल लंपास झाला.

आनंद वाटिका परिसर आधीच नैसर्गिक आपत्तीच्या संकटात सापडला होता त्यात आनंद वाटेकेतील नागरिक कसे बसत बचावले परंतु महापुरे कुटुंबावर पुन्हा एकदा संकट आले आहे पोलिसांनी सदर परिसरात रात्री गस्त वाढवणे आवश्यक आहे सदर परिसरात सर्व नोकरदार वर्ग असतो त्यांची मुले बाळे घरी असतात पोलिसांनी सदर बाबीकडे गंभीरतेने लक्ष देऊन लवकरात लवकर चोरांना पकडावे अशी मागणी आणण्यासाठी नागरी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news