सहदेवराव भोपळे विद्यालयाच्या कु.सौम्या बाळापुरे हीची जिल्हास्तरावर निवड
मनोज भगत
हिवरखेड(प्रतिनिधी) अकोला जिल्ह्याच्या माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ.सुचिता पाटेकर यांच्या पुढाकारातून राष्ट्रीय विज्ञान संग्रहालय परिषद कोलकताच्या वतीने तेल्हारा तालुकास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान मेळाव्यात सहदेवराव भोपळे विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सौम्या दिलीप बाळापुरे हिने यश प्राप्त केले असून तिची निवड जिल्हास्तरावर झाली आहे. या तिच्या यशाबद्दल महात्मा फुले शिक्षण संस्थेचे संस्थापक दादासाहेब भोपळे, अध्यक्ष अनिलकुमार भोपळे, कोषाध्यक्ष पुखराज राठी, कार्यवाह श्यामशील भोपळे, संस्थेचे सहकार्यवाह स्नेहल भोपळे, प्राचार्या रजनी वालोकार, पर्यवेक्षक प्रा.संतोषकुमार राऊत आदींनी त्याचे कौतुक करून जिल्हास्तरावरील सहभागासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या. कु.सौम्या आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक विज्ञान शिक्षक रंजित राठोड व आपल्या आई-वडिलांना देते.