आमदार रणधीरभाऊ सावरकर विद्यार्थ्यांच्या पाठीशी

आमदार रणधीरभाऊ सावरकर विद्यार्थ्यांच्या पाठीशी

 

निखिल इंगळे सह किरण निमकंडे – आचार्य कृषी पदवीधारकांना महाज्योती आणि सारथी संशोधन अधिछात्रवृत्ति मिळणे करिता पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला येथील विद्यार्थ्यांनी अकोला पूर्वचे तरुण तडफदार अभ्यासू कर्तव्यदक्ष आमदार आदरणीय श्री रणधीर भाऊ सावरकर यांची भेट घेऊन मागणी केली.

संशोधनाला चालना मिळावी याकरिता महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था सारथी व महाज्योती स्थापन करून पीएचडी करणाऱ्या संशोधकांना छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि मानवी विकास संस्था वर्ष 2018 व महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्ति वर्ष 2021 या योजनेद्वारे फेलोशिप प्रदान करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे तो प्रशंसनीय आहे मागील 3 वर्षापासून सारथी व महाज्योती या संस्था सरसकट सर्व पीएचडी विद्यार्थ्यांना संस्थेने छात्रवृत्ती दिली आहे मग 2023 या वर्षाच्या जाहिरातीमध्ये फक्त 50 जागा का? याविषयी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी शासनाकडे विषय मांडून त्यामध्ये सुधार करावा व आमच्यावर होत असलेल्या अन्यायाला आळा घालून आम्हाला न्याय द्यावा अशी अकोला येथील डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे निशांत झटाले, रुपेश गांजरे,गौरव मिटकर,शुभम पाटील,बालाजी जाधव,शुभम काकड,शुभम ढवळे, धनंजय शिरसाट,शुभम महाजन व इतर विद्यार्थ्यांनी मागणी केली.

2023 पासून या अधीक्षक वृत्तीच्या लाभार्थी संख्येवर मर्यादेची अट घालून ही संख्या अतिशय नगण्य करण्यात आली आहे या जागा सारथी व महाज्योती च्या एकूण विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात खूप कमी आहेत. कृषि विध्यापीठातील आचार्य पदवी घेणारे सर्व विधार्थी हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून, नियमित आचार्य पदवी धारक (regular degree program) आहेत व शेतकऱ्यांसाठी संशोधन करत असुन त्यांना या फेलोशिपचा संशोधनासाठी फायदा होत आला आहे. परंतु अचानक झालेल्या या निर्णयामुळे हे सर्व आचार्य पदवी घेणारे कृषि विधार्थी अधिछात्रवृतीचा लाभापासून वंचित राहतील आणि याचा सर्वस्वी परिणाम कृषि क्षेत्रातील संशोधनावर दिसून येईल. जर शेतकऱ्यांचा हितासाठी नवीन संशोधन चालू ठेवायचे असेल तर या शेतकऱ्यांच्या मुलांना सारथी व महाज्योती यांच्या माध्यमातून मिळणाऱ्या अधिछात्रवृतीचे पाठबळ मिळणे आवश्यक आहे. जेणेकरून हे शेतकर्ऱ्यांचे मुल कोणत्याही आथिऀक अडचणीचा सामना न करता त्यांचा पूर्ण ताकतीने कृषि क्षेत्रात संशोधन करतील.तरी या जागा मर्यादित न ठेवता सारथी व महाज्योती संस्थेने सर्व कृषी विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप देऊन त्यांचे हात आथिक दृष्ट्या बळकट करण्यात यावे. ही प्रमुख मागणी केली आहे. नवीन नियमांची अंमलबजावणी करताना विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रिया अगोदरच नवीन निकषांची पूर्व सूचना देणे गरजेचे होते परंतु तसे न करता संस्थांनी नवीन नियमाची अंमलबजावणी विद्यार्थ्यांचे एक सत्र पूर्ण झाल्यानंतर केली आहे त्यामुळे आचार्य पदवीचे विद्यार्थी संभ्रमित झालेले आहेत.

अधिछात्रवृत्ति च्या आधाराविना आचार्य पदवी पूर्ण करणे अशक्य आहे परंतु नवीन निकषामुळे मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या अधिछात्रवृत्ति पासून वंचित राहून आर्थिक दृष्ट्या हतबल होतील त्याकरिता सारथी व महाज्योतीच्या सर्व कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांना सरसकट अधिछात्रवृत्ती देण्यात यावी, अधीछात्रवृत्ति पात्रता परीक्षा रद्द करण्यात यावी व सदर प्रक्रियेला विलंब न करता लवकरात लवकर पुनर्विचार करून नवीन नियमावली जाहीर करण्यात यावी करिता रणधीर भाऊ सावरकर यांनी विशेष लक्ष द्यावे अशी सुद्धा या विद्यार्थ्यांनी मागणी केली आहे विद्यार्थ्यांचे सर्व म्हणणे एकूण आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी या विषयात विशेष लक्ष देऊन वरिष्ठांशी चर्चा करून तुमचा प्रश्न शासन दरबारी मांडून लवकरात लवकर या योजनेमध्ये बदल करण्याकरिता मी स्वतः लक्ष देऊन प्रयत्न करेल व तुम्हाला लवकरात लवकर न्याय मिळेल असा विश्वास आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी विद्यार्थ्यांना देऊन विद्यार्थ्यांचे समाधान केले यावर विद्यार्थ्यांनी आमदार रणधीर भाऊ सावरकर यांचे खूप खूप आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news