तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यामध्ये कु. पुनम भटकर प्रथम
अकोट प्रतिनिधी – जिल्हा परिषद अकोला शिक्षण विभाग पंचायत समिती अकोट व अकोट तालुका विज्ञान अध्यापक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने भाऊसाहेब पोटे विद्यालय आकोट येथे अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विज्ञान मेळावा मध्ये अकोट तालुक्यातील एकूण 22 शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. त्यामध्ये दोन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरासाठी निवड करण्यात आली त्यामध्ये प्रथम क्रमांक हा राधाबाई गणगणे विद्यालय मुंडगाव ची विद्यार्थिनी कु. पूनम गजानन भटकर हिने मिळवला तिने आपल्या यशाचे श्रेय राधाबाई गणगणे विद्यालयाचे मुख्याध्यापक चंद्रशेखर आंबेडकर , बाळासाहेब काटे व मार्गदर्शक शिक्षक व आई-वडिलांना यांना दिले. त्यामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य प्रवीण रावणकार लाभले होते. तर प्रमुख उपस्थितीत विज्ञान मंडळाचे विभागीय अध्यक्ष डॉ रवींद्र भास्कर , निशिकांत भुरे, तृप्ती बिजवे ,कु. नूतनवर्षा देशमुख, प्रा. भरत नागरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनीष निखाडे व सूत्रसंचालन उज्वला तायडे तर आभार प्रदर्शन विक्रम सावरकर व लंके यांनी केले.