अतिवृष्टी ची मदत मिळाली नसल्याच्या विरोधात उद्धव ठाकरे गट शिवेसनेचा जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिय्या मोर्चा
जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शहरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झाले होते शासनाकडून घोषणा करण्यात आली होती की ज्यांच्या घरात पाणी शिरले ज्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यांना अतिवृष्टी ची मदत देण्यात येणार मात्र अध्यपही अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या नुकसान ग्रस्तना नागरिकांना मदत मिळाली नसल्याचा आरोप करीत त्यांना तात्काळ मदत देण्यात यावी ही मागणी करीतउद्धव ठाकरे गट शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली नुकसान ग्रस्तांना सोबत घेत जिल्हाधिकारी कार्यालय समोर या विरोधात ठिय्या आंदोलन केले.जोपर्यंत तात्काळ मदत देण्यात येत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा यावेळी आंदोलन कर्यांनी केला.