म्हैसांग कट्यार रामगाव येथे लंपी चर्म रोगाचे लसीकरण ….
म्हैसांग. प्रतिनिधि संदिप राठोड – पशुवैद्यकीय दवाखाना म्हैसांग.. अंतर्गत येणाऱ्या म्हैसांग रामगाव कट्यार येथे लंपी चर्म रोगाचे लसीकरण करण्यात येत आहे आजूबाजूच्या जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने गोवंशिया जनावरांवर युद्ध पातळीवर लसीकरण चालू आहे लंपीचा प्रादुर्भाव होऊ नये याकरिता विशेष काळजी घ्यावी असे आव्हान पशुधन विकास अधिकारी डॉ. आकाश मस्के यांनी शेतकऱ्यांना आव्हान केले आहे. म्हैसांग. कट्यार. रामगाव येथील घरोघरी जाऊन लसीकरण चालू आहे लसीकरणाच्या वेळी म्हैसांग गावातील सरपंच मनोज भाऊ देशमुख. कट्यार गावातील सरपंच गोपाल ठाकरे. तसेच रामगाव येथील सरपंच अजय गावंडे उपस्थित होते देवानंद गावंडे आकाश राठोड दिलीप गावंडे सुभाष कडू अनिल गवई व गावातील नागरिक उपस्थित होते.