पो. स्टे. डाबकी रोड पोलीसांची धडक कारवाई
अवघ्या २४ तासांचे आत दोन अटटल घरफोड्यांना अटक करून जप्त केला लाखोंचा सोन्यांचा ऐवज
पोलीस स्टेशन डाबकी रोड अकोला येथे दिनांक १८/०८/२०२३ रोजी फिर्यादी यांनी जबानी रिपोर्ट दिला की, ते दिनांक १८/०८/२०२३ चे सकाळी ११/०० वा. चे सुमारास त्यांचे घरास कुलूप लावून बाजूला काहि अंतरावर असलेले त्यांचे दुसरे घरी गेले होते ते सायंकाळी ०५/०० वा. घरी परत आले असता त्यांना त्यांचे राहते घराचे मुख्य दरवाज्याचे कुलूप तुटलेले दिसले आत जावून पाहिले असता बेडरूमला लावलेले कुलूप सुध्दा तुटलेले दिसले आत जावून पाहणी केली असता आतील एक लाकडी कपाटाचे सेन्ट्रल लॉक तुटून कपाट उघडे दिसले व त्यातील ड्राव्हरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने एकूण ७३ ग्रॅमचे कि. अं. २९, २००/ रु., चांदीचे दागिने कि. अं. २०००/ रु. व नगदी १५,०००/ रु. असा एकूण ४६,२०० रु. चा मुददेमाल चोरुन नेला. अशा सविस्तर फिर्याद वरुन पो स्टे ला अप नं २२९ / २०२३ कलम ४५४,३८० भा. दं. वि. प्रमाणे दाखल करून तपासात घेतला.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्ट्रीने तात्काळ वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे, पोउपनि संभाजी हिवाळे व त्यांचे सोबतचे पथकातील पो. अंमलदार यांनी तपासाची सूत्रे हातात घेवून गुन्हयाचे मोडस ऑपरेंडी तसेच गुप्त बातमीदार यांचे कडून माहिती प्राप्त करुन गुन्हयातील संशयीत आरोपी नामे १. धनंजय दिलीप पवार रा गजानन नगर गल्ली के ७, डाबकी रोड अकोला व अंकुश राजेश कुलकर्णी रा. वानखडे नगर, डाबकी रोड अकोला यांना ताब्यात घेवून तपास करणारे अधिकारी व अंमलदार यांनी त्यांचे कौशल्याचा योग्य वापर करून विचारपूस केली असता आरोपी यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली मात्र मुददेमालाबाबत उडवाउडवीचे उत्तरे देवून लागले. त्यामुळे आरोपी यांना सदर गुन्हयामध्ये अटक करुन विचारपूस केली असता आरोपी नामे धनंजय पवार याने गुन्हयातील चोरी गेलेल्या मालाबाबत पंचासमक्ष निवेदन दिल्याने त्यांचे कडून चोरी केलेले सोन्याचे दाग-दागिने वजन ९० ग्रॅमचे एकूण कि. अं. ४,५५,०००/ रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधिक्षक श्री संदीप घुगे सर, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अभय डोंगरे साहेब उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुभाष दुधगावकर साहेब, यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार किशोर जुनघरे, पोउपनि संभाजी हिवाळे, सोबत पो. स्टॉफ पोहेकॉ दिपक तायडे १३८६, पोहेकॉ असद खान ब नं १२४, पोहेकॉ सुनिल टोपकर ब नं १३८३, नापोकॉ राजेश ठाकूर व नं ११८१, प्रविण इंगळे व नं २०९१, पोकों मंगेश इंगळे व नं २६९, पोकों मंगेश गिते व नं २२५५ यांनी केली.