भितीदायक थरार अखेर थांबला..
प्रभागातील रवि नगर, वर्धमान नगर आणि जुने खेतान नगर परिसरात गेल्या 4 दिवसांपासून धुडगूस घालत असलेली गाय चार तासांच्या अथक परिश्रमाने मनपा कर्मचारी व परिसरातील नागरिकांच्या मदतीने म्हैसपुर येथील गौरक्षण मध्ये दाखल करण्यात आली.
रवि नगर,वर्धमान नगर,जुने खेतान नगर परिसरात एका गायीने दहशत पसरविली होती.जुने खेतान नगर मधील रहिवासी श्री गणेश लाहोळे यांच्या 6 वर्षाच्या लहान मुलाला गंभीर जखमी करून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना धडक मारून ही गाय जखमी करत होती. या गायी च्या भीतीने माता भगिनी आपल्या मुलांना बाहेर खेळायला सुद्धा जाऊ देत नव्हत्या.
आज मनपा च्या कोंडवाडा विभागा सोबत संपर्क करून तातडीने मनपा कर्मचारी आणि भटके जनावरे पकडण्याची यंत्रणा असलेली गाडी बोलाऊन घेत त्या मारक्या गायीला जेरबंद करून गौरक्षण मध्ये पाठविण्यात आले.हा संपूर्ण थरार 4 तासा पर्यंत चालला.परिसरातील नागरिकांमध्ये भीती चे वातावरण पसरलेले होते ते आता नाहीसे झाले या मध्ये रविनगर मधील सर्व नागरिक व युवकांनी अथक परिश्रम घेतले.त्या सर्वांचे आभार.. ॲड.कुणाल काशिनाथ शिंदे भाजपा युवा मोर्चा महानगर सरचिटणीस प्रभाग 20 यांनी सत्य लढायला उपलब्ध करून दिला…