स्थानिक गुन्हे शाखा, अकोला ची अवैधरीत्या गोवंश कत्तलकरीता निर्दयतेने बांधुन ठेवणा-या २ ईसमांवर कारवाई करून २८ गोवंशांसह एकुण १२,००,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त!
पोउपनि गोपीलाल मावळे, स्थानिक गुन्हे शाखा, अकोला हे दिनांक २१/०८/२०२३ रोजी पोस्टे. पातुर हद्दीत ग्राम पातुर येथे विशेष पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय बातमीदारा मार्फत खबर मिळाली की, मुजावर पुरा पातुर येथील गोठानावर फकीरा याचे गोठयात नामे (१) मोहम्मद असलम (२) शेख वाजीद यांनी मोठ्या प्रमाणात गोवंश हे कत्तली करीता निर्दयतेने बांधुन ठेवलेले आहेत. अशा खबरे वरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि/ शंकर शेळके सा. यांचे मार्गदर्शन व सुचनेप्रमाणे दोन पंचांसमक्ष मिळालेल्या गोपनिय खबरे प्रमाणे मुजावर पुरा पातुर येथील फकीरा यांचे गोठ्यात छापा कारवाई केली असता त्याठिकाणी मोठया प्रमाणात गोवंश जातीचे बैल व गो-हे दिसुन आले, तेथील गोवंशाना चारा-पाण्याशिवाय निर्दयतेने बांधलेले दिसुन आले तसेच त्यांचे अंगावर ठिकठिकाणी जखमांचे निशाण दिसुन आले. सदर ठिकाणी हजर आलेल्या दोन इसमांस त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मोहम्मद असलम शेख हाशम वय ४० वर्ष रा. उर्दु शाळा नं. २ जवळ, मुजावर पुरा, पातुर २ ) शेख वाजिद शेख इब्राहीम वय ३० वर्ष रा. चमन मस्जीदजवळ, मुजावर पुरा, पातुर असे सांगितले. त्यांना सदरचे २८ गोवंश पैकी २३ बैल व ५ गोरे हे कोणाच्या मालकीचे आहेत हयाबाबत विचारणा केली असता त्यांनी कोणत्याच प्रकारची मालकी हक्काबाबतची पावती अथवा कागदपत्रे हजर केले नाहीत. त्यांना सदरचे गोवंश कशासाठी बांधले असे विचारले असता त्यांनी सदरची गोवंश हे कत्तली करीता बांधले असल्याचे जाहीर केल्याने अवैध कत्तल करीता बांधुन ठेवलेले गोवंश जातीचे एकुण २८ जनावरे एकुण किंमत अंदाजे १२,००,००/- रु. चा मुददेमाल जप्त करण्यात आला. सदरच्या २८ गोवंशांना गौरक्षण संस्थान, म्हैसपुर येथे दाखल करून वर नमुद ०२ आरोपींना पुढील कारवाईकामी पोस्टे. पातुर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.
सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक सा. श्री संदिप घुगे, मा. अपर पोलीस अधिक्षक श्री. अभय डोंगरे, पो. नि. शंकर शेळके, स्थागुशा यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि कैलास भगत, पोउपनि गोपीलाल मावळे, पोहवा, दत्तात्रय ढोरे, सुलतान पठाण, प्रमोद डोईफोडे, भास्कर धोत्रे नापोकॉ. अविनाश पाचपोर, महेंद्र मंलिये, विशाल मोरे पोकों, सतिश पवार व चालक नापोकॉ, नफिस शेख यांनी केली आहे.