खबरदार…मा. छगन भुजबळ साहेबांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र पेटून उठेल.
– प्रा. तुकाराम बिडकर माजी आमदार
कोणातरी देशपांडे नामक माथे फिरू ने मा. भुजबळ साहेबांना हात लावण्याबद्दल वक्तव्य केलं व त्यासाठी बक्षीस ही जाहीर केलं आहे. मला त्या देशपांड्याला सांगायच आहे की’ तुम्ही भुजबळ साहेबांना लेचा पेचा समजता काय ? त्यांच्या मागे महाराष्ट्रच नव्हे तर देशातील संपूर्ण ओबीसी समाज ताकतीने उभा आहे. त्यांच्या केसाला जरी धक्का लावला तर आम्ही त्या हात लावणाऱ्याचे हात कलम केल्याशिवाय राहणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठले असा इशारा महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष तथा माजी आमदार प्रा. तुकाराम बिडकर यांनी दिला आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा याची गंभीर दखल घ्यावी अशी विनंती ही शेवटी त्यांनी पत्रकात केली आहे.