स्व डँडी देशमुख स्मृती लघुचित्रपट महोत्सव नियोजन सभा संपन्न.
अकोला – विदर्भात सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करुन चित्रपट निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविणारे स्व. डँडी देशमुख यांच्या दिनांक 27 डिसेंबर रोजी जयंतीचे औचित्य साधून अकोला येथे दरवर्षी लघुचित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरम्यान 2023 या वर्षीचा महोत्सव आयोजित करण्यासाठी हॉटेल सेंटर प्लाझा येथे नियोजन सभा संपन्न झाली.सभेच्या अध्यक्षस्थानी सिने चित्रपट निर्माता, व कलाकार प्रा. तुकाराम बिडकर हे होते तर प्रमुख उपस्थिती प्रशांत देशमुख, डॉ राजेश देशमुख, संजय खडक्कार, कुणाल देशमुख, दिग्दर्शक निलेश जळमकर, गीताबाली उणवणे. आदींची उपस्थिती होती,
प्रसंगी सभेत प्रा तुकारामजी बिडकर यांनी नियोजनासंदर्भात मार्गदर्शन केले तर उपस्थितांनी नियोजनाबाबत महत्त्वपूर्ण सुचना मांडल्या.आलेल्या सुचनांच्या आधारे लघुचित्रपट महोत्सव यशस्वितेसाठी विविध कार्यक्रम समित्यांची निर्मिती करण्यात आली. सदर नियोजन बैठकीस प्राचार्य किसन मेहरे, कैलास देवबाले, अशोक राहाटे, अशोक भराड, अनिल मालगे, स्वप्निल बोरकर, छाया वानखडे, प्रतिभा कळंब, दिलीप अप्तुरकर ,संजय तायडे, माधव जऊळकर, जगतजीवन पल्हाडे, प्रभाकर मोहे , प्रफुल देशमुख, राजदत मानकर, बबलु तायडे आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्रा सदाशिव शेळके तर आभार प्रा श्रीराम पालकर यांनी मानले.