अखेर मनसेच्या आंदोलनाला यश अकोला – अकोट रेल्वेचा वेग वाढला!
मनसे जनहित कक्ष व विधी विभागाचे राज्य सरचिटणीस ऍड. नंदकिशोर शेळके यांनी अकोट येतील प्रवासी विद्यार्थी व व्यापारी वर्ग तसेच कर्मचारी वर्ग यांच्या विनंतीवरून दक्षिण मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक नांदेड यांना निवेदन दिले होते. गांधीग्राम येथील पुल शर्तीग्रस्त झाल्यामुळे सदर रस्त्यावरील एसटी बस बंद आहेत.प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात वेळेचे नुकसान होत होते.निवेदनामध्ये व्यापारी वर्गांचा तसेच शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात वेळेचे नुकसान होत असल्यामुळे
मनसेचे राज्य सरचिटणीस एडवोकेट नंदकिशोर शेळके यांना निवेदन दिले त्यावरून एडवोकेट शेळके यांनी निवेदन दिले व आंदोलनाची धमकी दिली होती. मनसेच्या दसक्या त्यामुळे मध्य रेल्वेचे रेल्वे प्रबंधक यांनी सदर रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करून अकोट अकोला रेल्वेची गती वाढून साठ ते सत्तर च्या स्पीडने सदर गाडी धावणार आहे. आज 23 ऑगस्ट रोजी सदर गाडीचे ट्रायल घेण्यात आले असून ही गाडी आता 60 ते 70 च्या स्पीडने धावणार आहे. सदर निवेदन मनसेच्या वतीने निवेदन देण्यात आल्यामुळे आज रेल्वे अकोला अकोट रेल्वे गाडीची स्पीड वाढल्यामुळे आज अकोला रेल्वे स्थानकावर मनसेने पेढे वाटून आनंद साजरा केला आहे. यावेळी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.