सेंट पॉल अकॅडमी हिवरखेडच्या विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा स्तरावर निवड
मनोज भगत
ग्रामीण प्रतिनिधी तेल्हारा
हिवरखेड येथील स्थानिक सेंट पॉल अकॅडमी हीवरखेड च्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धां मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत जिल्हास्तरावर बाजी मारली आहे.सेंट पॉल्स अकॅडमी हिवरखेड चे बॅडमिंटन संघ जिल्हा स्तरावर14 वर्षे वयोगट मुली कु.भक्ती लाखोटिया, कु. स्वरमयी आमले, कु. किमया हनुवंते,कु. प्रियल खारोडे,कु. रमणी हागे 14 वर्षे वयोगट मुले रुद्राक्ष घुंगड,कार्तिक हागे,विराज चोंडेकर,तुषार गावंडे,
अथर्व येऊल 17 वर्षे वयोगट मुले आर्यन इंगळे, वीर मसाळकर,ओम बाजारे,आदित्य भराटे,
एस के हुजेफा विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेमध्ये निवड झालेली आहे. विद्यार्थ्यांनीआपल्या यशाचे श्रेय आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक जगदीश वडाळकर यांना दिले आहे.या यशाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष प्रा. नवनीत लखोटीया सर , संस्थेचे उपाध्यक्ष लूणकरं डागा सर संस्थेचे सचिव प्रमोद चांडक सर व शाळे चे मुख्याध्यापक चंद्रकांत तिवारी ,नमिता गांधी यांनी शुभेच्छा दिल्या.