मोटरसायकल चोरी प्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी लावला शोध!
पो. स्टे. सिटी कोतवाली, अकोला येथील तपास पथकाने गोपनीय माहिती अन्वये अप क्र 232/2023 कलम 379 भादवी मधील अज्ञात आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे शाकीर खान जागीर खान, वय 39 वर्षे रा. हमजा प्लॉट, अकोला याचे कडून सदर गुन्ह्यात चोरी गेलेली स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटर सायकल क्रं MH-30-AE-4306 कीमत अं 20,000 रु व पो स्टे खदान येथील अप क्रं 424/2023 कलम 379 भादवी मधील चोरी गेलेली होंडा ऍक्टिव्हा मोटर सायकल क्रं MH-30-X-2758 किं अं 20,000 असे दोन गुन्ह्यातील मोटार सायकली हस्तगत करण्यात आले आहे.तर पो स्टे सिटी कोतवाली अप क्रं 145/2023 कलम 379,34 भादवी मध्ये आरोपी नामे 1) शिवराज वक्ते, 2) अविनाश वक्ते,3) महावीर वक्ते सर्व रा जिल्हा बुलढाणा यांचे कडून गुन्ह्यात चोरी गेलेली स्प्लेंडर प्लस कंपनीची मोटार सायकल क्रं MH-35-AL-1598 किं अं 25,000 रु ची हस्तगत करण्यात आली आहे
अशा प्रकारे पो स्टे सिटी कोतवाली व पो स्टे खदान येथील एकूण 3 गुन्हे उघडकीस आले असून गुन्ह्यातील चोरी गेलेले 03 मोटार सायकली एकूण किं 65,000 रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेब, मा. अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे साहेब, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधागांवकर साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पो स्टे सिटी कोतवाली प्रभारी अधिकारी पोनी सुनील वायदंडे , पोहवा महेंद्र बहादूरकर, पोहवा अश्विन सिरसाट , नापोका अमित दुबे, नापोका ख्वाजा शेख, पोका निलेश बुंदे, पोका किशोर येऊल, पोका अमोल दाळू व पोका शैलेश घुगे यांनी केली आहे.