अकोला महानगरपालिका प्रभाग क्रं. 1 नायगांव येथे नागपुर-मुंबई मध्य रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी अंडरपास मार्ग द्या!
महानगरपालिका हदीत प्रभाग क्रं. 1 नायगावची लोकसंख्या 16,438 इतकी भुगोलीक परिस्थिती पाहिली तर नायगांव पश्चिमेला मोर्णा नदी, उत्तरेला शिलोडा साद पुर्वेला हैद्राबाद-खंडवा दक्षिण मध्य रेल्वे लाईन आणि दक्षिणेस नागपुर-मुंबई मध्य रेल्वे लाईन आहे. म्हणजे सर्व बाजुनी वेढलेले आहे.
नायगाव ते अकोला शहराला जोडणा-या मार्ग दरम्यान नागपुर-मुंबई रेल् लाईनचा अडथळा कायम आहे, या नागपुर मुंबई रेल्वे लाईन खाली एक लहान मोहरी असुन या माहेरीतून दोन चाकी मोटर सायकल व तिन चाकी ऑटो मोठ्या कष्टाने जातात.
आपात्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि शेतीसाठी अत्यंत महत्वाची असलेली ट्रॅक्टर ट्राली यासारखी जड वाहने या मोहरीमधुन जाऊ नाहीत, मात्र 7 ते 8 किलो मिटरचा प्रवास सहन करून अकोट फैल या मार्गाने वाहतुकीच्या अडचणींचा सामना करत नायगांवला येतात, आपात्कालीन परिस्थितीत घातक ठरत आहे. गंभीर रुग्णाच्या दवाखान्यात पोहोचण्यास उशीर झाल्याने त्याचा मृत्यूही होऊ शकतो.
वरील कारणांचे गांर्भीय लक्षात घेऊन नागपुर- मुंबई मध्य रेल्वे ओलांडण्यासाठी अकोला महानगरपालिका प्रभाग क्र. 1 नायगांव येथे नागपुर-मुंबई मध्य रेल्वे लाईन वर अस्तीत्वात असलेल्या लहान मोहरी एवजी मोठा अंहस्थास मार्ग सवार करण्यात यावा. जेणेकरून रुग्णवाहीका, अग्रिशमन वाहन आणि जडवाहने सहज जाऊ शकतात. अशी मागणी माजी नगरसेवक अ. रहीम अ. कादर पेन्टर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.