कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

कावड यात्रा उत्सवाच्या दिवशी वाहतूक मार्गात बदल नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार

अकोला, दि. 24 : श्रावणातील तिस-या, तसेच शेवटच्या सोमवारी शहरात मोठ्या प्रमाणावर आयोजित कावड यात्रा लक्षात घेऊन अकोला-अकोट राज्य महामार्ग व दर्यापूर मार्गावरील, तसेच अकोला शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. त्याबाबतचा आदेश जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांनी जारी केला.
अकोला शहरात श्रावण सोमवारी आयोजित कावड व पालखी मिरवणुकांमध्ये अनेक पालख्या व हजारो शिवभक्त सहभागी होतात. श्रावणातील शेवटच्या सोमवारी मोठ्या प्रमाणावर कावड यात्रा असते. यंदा दि. 11 सप्टेंबरला शेवटचा श्रावण सोमवार आहे.
कावड यात्रेच्या आदल्या दिवशी दुपारी 12 वा. पासून मोठ्या संख्येने शिवभक्त गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे जल घेऊन मध्यरात्रीनंतर पायदळ कावड यात्रेद्वारे अकोला येथील श्री राजराजेश्वर मंदिराकडे निघण्यास सुरूवात होते. कावड यात्रेचा मार्ग हा अकोट राज्य मार्ग असून, त्याची दुरुस्ती प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक यांनी प्रस्तावित केल्यानुसार जिल्हा दंडाधिकारी श्री. कुंभार यांनी हा आदेश निर्मगित केला.
त्यानुसार तिस-या सोमवारनिमित्त दि. 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजेपासून ते दि. 5 सप्टेंबर रोजी सायं. 7 वाजेपावेतो व अकोला शहरातील कावड पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतूक दि.4 सप्टेंबरच्या रा. 8 वाजतापासून ते दि. 5 सप्टेंबर रोजी रा. 12 वाजेपर्यंत आणि चौथा व शेवटच्या सोमवारनिमित्त दि. 10 सप्टेंबरच्या दुपारी 12 वाजेपासून दि. 11 सप्टेंबरच्या रा. 8 वाजेपर्यंत व अकोला शहरातील कावड पालखी मिरवणूक मार्गावरील वाहतूक दि. 10 सप्टेंबरच्या रा. 8 वाजेपासून ते दि. 11 सप्टेंबरच्या रा. 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.
अकोला – अकोट राज्य महामार्गावरील तसेच अकोला – दर्यापूर मार्गावरील वाहतूकीत बदल : सध्या सुरू असलेला मार्ग अकोला बस स्थानक, रेल्वे स्टेशन चौक, आपातापा चौक, गांधीग्राम मार्गे अकोटकडे जाणारी वाहतूक व अकोट ते अकोलाकडे याच मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्ग अकोला बस स्थानक, पोस्ट ऑफिस चौक, अशोकवाटिका चौक, जेल चौक, पत्रकार चौक, वाशिम बायपास, शेगाव टी पॉईंट, गायगाव, निंबा फाटा, देवरी–अकोट. तसेच अकोट ते अकोला येणारी सर्व प्रकारची वाहतूक याच मार्गाने वळविण्यात येईल.
त्याचप्रमाणे, सध्या सुरू असलेला मार्ग अकोला बसस्थानक, रेल्‍वे स्थानक चौक, आपातापा चौक, म्हैसांग मार्गे दर्यापूर, तसेच दर्यापूर ते अकोल्याकडे याच मार्गाने येणारी सर्व प्रकारची वाहतूक. अकोला बसस्थानक, टॉवर चौक, न्यायालय मेन गेटकडून टिळक पार्क, सातव चौक, बिर्ला राममंदिर रेल्वे गेट, नवे तापडियानगर, ग्राम खरब, खरप टी पॉईंट, म्हैसांग मार्गे दर्यापूर, तसेच दर्यापूर ते अकोल्याकडे येणारी सर्व वाहतूक याच मार्गाने वळविण्यात येईल.

अकोला शहरातील मिरवणूक मार्गावरील वाहतूक : सध्या सुरू असलेला मार्ग रेल्वेस्थानक चौक ते रेल्वे पूल, अकोट स्टँड ते बियाणी चौक, कोतवाली चौक, लक्झरी बस स्थानक, वाशिम बायपासकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्ग रेल्वेस्थानक चौक, अग्रसेन चौक, नवीन उड्डाण पुलावरून जेल चौक, लक्झरी बसस्थानक, वाशिम बायपासकडे वळविण्यात येईल.
अकोला नवीन बसस्थानकाकडून गांधी चौक, कोतवाली चौक, जयहिंद चौक, डाबकी रस्ता, तसेच पोळा चौक, हरिहरपेठकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पर्यायी मार्ग अकोला नवे बसस्थानक, अशोकवाटिका चौक, जेल चौक, लक्झरी स्थानक, वाशिम बायपास चौक, हरिहरपेठ, किल्ला चौक, भांडपुरा चौक, डाबकी रस्त्याकडे वळविण्यात येईल.
डाबकी रस्ता, जुने शहर, श्रीवास्तव चौक, विठ्ठल मंदिर, अलका बॅटरी, जयहिंद चौक, कोतवाली चौक, गांधी चौक, अकोला बसस्थानक, तसेच डाबकी रस्ता, जुने शहर, भीमनगर चौक, दगडी पूल, मामा बेकरीकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्ग डाबकी रस्ता, जुने शहर, भांडपुरा चौक, पोळा चौक, किल्ला चौक, हरिहरपेठ, वाशिम बायपास चौक, लक्झरी बसस्थानक, शासकीय बगिचा, जिल्हाधिकारी कार्यालयासमोरून अशोकवाटिका चौक बसस्थानकाकडे वळविण्यात येईल.
लक्झरी बसस्थानक, शासकीय बगीचा, कोतवाली चौक, टिळक रस्ता, अकोट स्टँड, रेल्वेस्थानकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्ग लक्झरी बसस्थानक चौक, जेल चौक, नव्या उड्डाण पुलावरून अग्रसेन चौक, रेल्वेस्थानक चौकाकडे वळविण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news