स्वाती कंपनीला दिलेला कंत्राट हा भाजपच्या दबावात!

स्वाती कंपनीला दिलेला कंत्राट हा भाजपच्या दबावात!

उबाठा टप्पा टप्प्याने आंदोलन करणार

जनता स्वयं टॅक्स भरत असताना स्वाती कंपनीला कमिशन कसे देणार..

अकोला. गेल्यावेळी सत्तेत असलेल्या भाजपने लोकांना जाणीवपूरवक अतिरीक्त करवाढ लादली याबाबत प्रकरण न्यायालयात प्रलंबित असताना प्रशासक कविता द्विवेदी यांनी भाजपच्या दवाबात येऊन केवल २कंपन्यांनी टेंडर भरले असताना स्वाती कंपनीला कंत्राट दिला गेला तो फक्त भाजप दावाबात येऊन दिला आहे त्यामुळे शिवसेना ऊबाठा
येत्या सोमवारपासुन शहरात जनतेला जागृत करण्यासाठी
उबाठा टप्पा टप्प्याने आंदोलन करणार असल्याचा इशारा आज राजेश मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे

मनपा कर्मचाऱ्यांनी प्रशासक तथा आयुक्त कविता द्विवेदी यांच्या मार्गदर्शनात मोठया प्रमाणावर टॅक्स वसुलीसाठी प्रयत्न केले आहेत तरीही केवळ भाजपा नेत्यांच्या कंत्राटदाराला कंत्राट देण्यासाठी शहरांतील जनतेने स्वयं प्रेरणेने भरलेल्या टॅक्स वर कंपनीला कमिशन देणार नाही ऊबाठा शहरातील जनतेला आवाहन करत आहे की, केवळ मनपा कर्मचारी फक्त वसुली ला आले तरच टॅक्स द्या. स्वाती कंपनीला टॅक्स देऊ नका याचीच जागृती निर्माण करणे सुरु आहे अशीही माहिती त्यानी आज दिली

यावेळी राजेश मिश्रा, उपशहरप्रमूख मंगेश काळे, युवा सेना जिल्हा प्रमुख अभय खुमकर, माजी नगरसेवक गजानन चव्हाण, शहर प्रमूख राहुल कराळे, मुकेश मुरूमकर, नितिन ताकवाले, शरद तुरकर, तरुण बगैरे, मनीष मोहड, गजानन बोरले, आशीष तिवारी, लक्ष्मण पंजाबी, संजय अग्रवाल, सुनिल दुर्गिया, चेतन मारवाल, प्रमोद धर्माळे, प्रकाश वानखेडे, किरण ठाकरे, अंकूश संत्रे, आकाश राऊत, अजय दुबे आदींची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news