रविवारी महानगरात मारवाडी युवा मंचची सायक्लोथॉन रैली
अकोला-अखिल भारतीय मारवाडी युवा मंचच्या फिट इंडिया उपक्रम अंतर्गत अकोला शाखेच्या वतीने राष्ट्रीय क्रीडा दिनावर सायक्लोथॉन ही सायकल प्रेमींसाठी रॅली आयोजित करण्यात आली आहे. पर्यावरण व आरोग्याचा समतोल राखण्यासाठी हा उपक्रम अखिल भारतीय स्तरावर आयोजित करण्यात आला आहे.त्या अनुषंगाने अकोला महानगरात दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी 6-30 वाजता राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयातून ही सायक्लोथॉन सायकल रैली प्रारंभ होणार आहे. 14 वर्षावरील सर्व वयोगटासाठी आयोजित या सायक्लोथोन रॅलीत सात किमी अंतर राहणार असून यात सेल्फी बूथ व संगीत सुरू राहणार असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती खंडेलवाल भवनात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. ही सायकल रॅली नेहरू पार्क चौक,सरकारी बगीचा,सिटी कोतवाली, तिलक रोड, अकोट स्टॅन्ड, अग्रसेन चौक, दुर्गा चौक, रतनलाल प्लॉट, सिविल लाईन चौक मार्गे पुन्हा आरडीजी महाविद्यालय प्रांगणात येऊन या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत या सायक्लोथॉन रॅलीचे समापन करण्यात येणार आहे. यात सहभागी होणाऱ्या सर्व नागरिकांना प्रमाणपत्र व प्रशस्तीपत्र देण्यात येणार असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.या अभिनव रॅलीस राधादेवी गोयनका महिला महाविद्यालय, जिल्हा क्रीड़ा अधिकारी कार्यालय, बाकेबिहारी इंफ्रा,युटीआय म्यूचुअल फंड, एनसीसी, अन्न वा औषध प्रशासन, अनीश एंटरप्राइजेज, रेडियो ऑरेंज,दुर्गेश डेकोर, आशीर्वाद इवेंट, गुलाब साउंड,अजिंक्य फिटनेस, रॉबिन हुड आर्मी,अस्तित्व फाउंडेशन,विठ्ठल तेल आदी संस्थांचे सहकार्य मिळत असल्याचे सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेत यावेळी मारवाडी युवा मंचचे मार्गदर्शक निकेश गुप्ता,प्रांतीय पदाधिकारी मनोज अग्रवाल,जिल्हा शाखेचे अध्यक्ष नमन खंडेलवाल, प्रकल्प प्रमुख आशुतोष वर्मा, पियुष खंडेलवाल, कुशल जैन, हर्षवर्धन केडिया, शिवम रांदड, लवेश कागलीवाल,स्वप्नील जैन,निलेश बोर्डेवाला, युवा मंच उपाध्यक्ष रोहित रूगटा, सुनील शर्मा, गोपाल टेकडीवाल, सचिव भूषण अग्रवाल, कोषाध्यक्ष कृष्णा तातिया, सहसचिव योगेश गोयल, सुरज काबरा, सहकोषाध्यक्ष अभिजीत गोयनका, पीआरओ ऋषी अग्रवाल, रोहित गुप्ता आदी उपस्थित होते.