आ डॉ राहुल पाटील शैक्षणिक संस्थेतर्फे किड्स पॅराडाईज शाळेमध्ये बाल रक्षा किट वितरण कार्यक्रम संपन्न.
पातूर दि 26/08/23
डॉ.वंदनाताई ढोणे ग्रामीण आयुर्वेद महाविद्यालय,आमदार डॉ.राहुल पाटील शैक्षणिक संकुल तसेच अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान नवी दिल्ली,आयुष मंत्रालय, (भारत सरकारच्या अंतर्गत स्वायत्त संस्थान) यांच्या संयुक्त विद्यमाने बालरोग विभागा मार्फत बालरक्षा किटचे महाविद्यालयाच्या बालरोग विभागाकडून वितरण, कार्यक्रम पातूर शहरातील किड्स पॅराडाईज शाळे मध्ये घेण्यात आला.या शाळेमध्ये 140 किट वितरण करण्यात आल्या. बालरोग विभाग प्रमुख डॉ प्रजकता कपाटे डॉ.चेतन लांडकर,डॉ.संगीता रिठे यांनी किट चे महत्व सांगताना लहान मुलांची प्रतिकारक शक्ती वाढणे, आजारापासून संरक्षण,पचनशक्ती सुधारणे,सर्दी, श्वास,खोकला यांचा प्रादुर्भाव कमी करणे असे अनेक फायदे या किट च्या उपयोगामुळे विद्यार्थ्यांना होतात हे सांगितले. या किटमध्ये च्यवनप्राश, आयुष बाल क्वाथ, संशोमणी वटी,आणि अणुतेल आहे.जी लहान मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. महाविद्यालयाचे संचालक डॉ.साजिद शेख, प्राचार्य डॉ जयश्री काटोले, डॉ.अभय भुस्कडे यांचे मार्गदर्शनात हा किट वितरण कार्यक्रम झाला.या किटच्या वितरणावेळी इतर पाचव्या वर्गापर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांनाही याचा लाभ घेता येईल अशी माहिती संचालक साजिद शेख व बालरोग विभाग,डॉ.नलिनीताई राऊत रुग्णालय प्रशासन यांचेकडून देण्यात आली तसेच महाविद्यालयाच्या रुग्णालयात हि किट उपलब्ध आहे याचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल असे सांगितले.या वितरण शिबिर प्रसंगी किड्स पॅराडाईज चे अध्यक्ष गोपाल गाडगे,प्राचार्य किड्स पॅराडाईज,बाल विभाग चे डॉ प्रजकता कपाटे डॉ. लांडकर,डॉ.संगीता रिठे, रुग्णालयाचे उप-अधीक्षक डॉ वसीम, डॉ.नवीन देवकर, आंतरवासीय सेवेतील डॉक्टर्स हे या कार्यक्रमाला उपस्थित होते. प्रशांत निकम धनंजय मिश्रा वसंत पोहरे, किड्स पॅराडाईज चे कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.