सायबर पोलीस स्टेशन, अकोला यांचेकडुन ‘सायबर गुन्हयांविषयी जनजागृती’ कार्यक्रम.
आजच्या युगात इंटरनेट हे आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. दैनंदिन जीवनातले बरेच व्यवहार आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून पार पडले जातात. जसे की आर्थिक व्यवहार, बँकिंग, व्यावसायिक, शैक्षणिक, वैद्यकीय व जनसंपर्क इत्यादी इंटरनेट माध्यमाने मानवी जीवन सुलभ झाले आहे हे जितके खरे तितकेच याच्या वापराबाबतच्या अपुल्या माहितीने ते धोक्यातही आले आहे. सायबर गुन्हेगार याच उणीवांचा फायदा उठवून इतरांचे आर्थिक व सामाजिक नुकसान करतात. त्यामुळे इंटरनेटचा वापर सुरक्षितरित्या करणे हि काळाची गरज आहे.
सायबर गुन्हयांविषयी विद्यार्थी वर्गाला त्याचबरोबर शिक्षक वर्गाला देखील सायबर गुन्हयांबाबत माहिती व
जनजागृती व्हावी याअनुषंगाने मा. संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, अकोला व मा. अभय डोंगरे, अपर पोलीस
अधीक्षक, अकोला यांच्या मार्गदर्शनात मा. विजय नाफडे, पोलीस निरीक्षक व सायबर पोलीस स्टेशन, अकोला
यांच्या मार्फत स्व. शंकरलाल खंडेलवाल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, डाबकी रोड, अकोला येथे दिनांक
२५/०८/२०२३ रोजी “सायबर जनजागृती कार्यक्रम” घेण्यात आला.
आजच्या काळात तरुण वर्गात वाढता सोशल मिडीयाचा वापर, ऑनलाईन आर्थिक व्यवहार तसेच इंटनेटच्या दैनंदिन जीवनातील वापर, त्याबरोबर सोशल मिडीया वापरतांना सुरक्षिततेच्या अनुषंगाने काय काळजी घ्यायला हवी? याबाबत देखील विद्यार्थी वर्ग आणि शिक्षक वृंद यांना सायबर जनजागृती कार्यक्रमाच्या वेळी मार्गदर्शन करून माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे ऑनलाईन खरेदी-विक्री करतांना खात्री केल्या शिवाय ऑनलाईन आर्थिक व्यवहार करू नये. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करतांना नेहमी अधिकृत वेबसाईटचाच उपयोग करावा. कोणत्याही आकर्षक जाहिरातीला प्रलोभित होवुन बळी पडु नये, अन्यथा आपली ऑनलाईन आर्थिक फसवणुक होवु शकते. त्याचप्रमाणे ऑनलाईन नोकरीविषयीच्या जाहिरातींना बळी पडु नये फसवणुक होवु नये याअनुषंगाने देखील यावेळी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून सायबर गुन्हयांबाबत जागृत करण्यात आले. त्याचप्रमाणे फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉटसअॅप, व्टिटर तसेच इतर सोशल मिडीयाचा वापर करतांना कोणत्याही आक्षेपार्ह पोस्टला लाईक करणे, शेअर करणे, कमेंट करणे हे टाळावे. सोशल मिडीयाचा वापर करतांना काय काळजी घ्यावी, सुरक्षीततेच्या अनुषंगाने विद्यर्थी वर्ग व शिक्षक वर्ग यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सोशल मिडीयाच्या माध्यमातुन होणाऱ्या सायबर गुन्हयांबाबत देखील जनजागृती करण्यात आली.