शासनाच्या योजना घराघरात पोहोचवा.. राजेश पाटील निरीक्षक शिवसेना अकोला जिल्ह्य
अकोला – आज अकोला महानगर शिवसेनेची शिव संघटन अभियान अंतर्गत आढावा बैठक प्रचंड उत्साहात शासकीय विश्रामगृह अकोला येथे अकोला जिल्ह्याचे निरीक्षक राजेश पाटील साहेब संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया साहेब सह संपर्क प्रमुख संदीप पाटिल जिल्हाप्रमुख अश्विन भाऊ नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडली यावेळी #शासन_आपल्या_दारी या योजने संदर्भात विस्तृत माहिती देण्यात आली तसेच जिल्ह्यात संघटन मजबूत करून आगामी निवडणुका जिंकण्या संदर्भात मार्गदर्शन तसेच अकोला महानगरातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचे कौतुक अकोला जिल्ह्याचे निरीक्षक श्री राजेश पाटील यांनी केले यावेळी संपर्कप्रमुख गोपीकिशन बाजोरिया यांनी मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कार्याची विस्तृत माहिती दिली तर जिल्हाप्रमुख अश्विन भाऊ नवले यांनी संघटनाचे महत्त्व विशद केले तसेच पदाधिकाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारून कामाला लागण्यास सांगितले. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख उषाताई विरक निशाताई गॅरल रोशनीताई श्रीनाथ यांच्या माध्यमातून अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. तसेच प्रभाग क्रमांक आठ मधील श्री अमोल पाटील यांनी सुद्धा यावेळी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी सहसंपर्कप्रमुख श्री संदीप दादा पाटील जिल्हाप्रमुख अश्विन नवले महानगर प्रमुख योगेश अग्रवाल शहर प्रमुख रमेश गायकवाड युवा सेनेचे महानगर प्रमुख सौरभ नागोसे संघटक सागर पुर्णेय गोपाल नागपुरे रवी देशमाने खिनोरे उपजिल्हाप्रमुख शशिकांत चोपडे तालुकाप्रमुख दीपक दांदळे प्रकाश गीते प्रवीण वैष्णव महिला आघाडीच्या उषाताई विरक निशा ग्यारल रोशनी श्रीनाथ स्वानंदी पांडे उपशहर प्रमुख गणेश गोगे नितीन बोराकडे सुनील उगले दीपक नावकार अजय बोदडे निशान सरोदे यांच्यासह मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक उपस्थित होते बैठकीचा आयोजन व संचलन महानगर प्रमुख योगेश अग्रवाल यांनी केले