व्हाईस ऑफ मिडीया संघटनेने दिले पत्रकाराच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

व्हाईस ऑफ मिडीया संघटनेने दिले पत्रकाराच्या मागण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन

अकोलार: व्हाईस ऑफ मिडीया (सा.विं.) च्या वतीने आज सोमवार दि. २८ ऑगस्ट रोजी पत्रकारांच्या मागणी संदर्भात आंदोलन करून मुख्यमंत्र्यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांचे मार्पâत निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, विनोद बोरे राज्य प्रदेशाध्यक्ष (सा.विंग) यांचे मार्गदर्शनात संपुर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्यात येत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पत्रकारांचे अनेक, सहज सुटणारे विषय तसेच प्रलंबित आहेत. या प्रश्नासंदर्भातल्या मागण्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ने वारंवार केल्या, आंदोलने केली, पण त्याला यश आले नाही. सरकार आणि प्रशासन यांनी पत्रकारांच्या रास्त असणाNया मागण्यांविषयी विचार करून, त्या मागण्या मान्य कराव्यात ही मागणी आहे.
मागण्या १) ज्या पत्रकारांना पत्रकारितेमध्ये दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे. राज्याच्या माहिती महासंचालनालयाने शासनाचे पोर्टल तयार करून, त्या पोर्टलवर नव्याने पत्रकारितेत पदवी पूर्ण करून किमान तीन महिने पत्रकारितेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे, अशांना पत्रकार म्हणून प्रमाणपत्र देण्यात यावे. (जसे की बार कौन्सिल वकिलांना वकिली करण्याचा अधिकृत परवाना देते तसे पत्रकार असल्याचा अधिकृत परवाना मिळावा.)
२) राज्यातील अनेक वर्तमानपत्र, साप्ताहिके, मासिक यांना जाहिराती देताना सातत्याने डावलण्याचा प्रकार पुढे आला आहे. तो प्रकार थांबून त्यांना जाहिराती देण्यात याव्यात. सर्वांना जाहिराती मिळतील याचे नवीन निकष तातडीने तयार करावेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्यात यावे. त्या महामंडळाच्या माध्यमातून पत्रकार, त्यांच्या पाल्यांना व्यवसायासाठी मदत करण्यात यावी. याबाबत सरकारने आपल्याकडे जी माहिती मागविली आहे ती तातडीने द्यावी.
३) माहिती महासंचालनालय यांच्या वतीने सकारात्मक पत्रकारितेला प्रोत्साहित करणारे पुरस्कार गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहेत, ते देण्यात यावे.
४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांच्या सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन २० हजार रुपये करू, अशी घोषणा केली होती. टीव्ही, रेडियो आणि सोशल मीडियात काम करणाNया पत्रकारांना श्रमिक पत्रकार म्हणून मंत्रिमंडळाने घोषणा केली, या दोन विषयांचा जीआर तातडीने काढावा. अधिस्वीकृती कार्ड आणि सेवानिवृत्तीनंतर देण्यात येणारे मानधन याबाबत असणाNया जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. त्याबाबत कमिटी नेमून ज्यांचे ज्यांचे प्रस्ताव रखडले आहेत, ते मार्गी लावावेत.
सर्व ठिकाणी वेगाने वाढणाNया आणि भविष्यात पत्रकारितेची नांदी असणाNया सोशल मीडिया पत्रकारितेसाठी तातडीने जाहिरातींबाबत पॉलिसी बनवावी. सोशल मीडियांनाही जाहिराती देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. ज्यांनी पत्रकारितेत किमान दोन वर्ष पूर्ण केली आहेत, अशा प्रत्येक पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांना विमा सुरक्षा कवच देण्यासंबंधीच्या सूचना प्रत्येक नोंदणी असलेल्या माध्यमाच्या मालकांना देण्यात याव्यात. सरकार आणि राज्य कामगार विभाग यांना या सूचनांचे पालन काटेकोर करण्याबाबत मार्गदर्शिका द्यावी. निवेदन देणारामध्ये ाqजल्हाध्यक्ष -पंजाबराव वर, विभागीय अध्यक्ष (सा.विं.) संतोष धरमकर, जिल्हा कार्याध्यक्ष-संजय भ़ निकस (पाटील), जिल्हा उपाध्यक्ष -डी. जे. वानखडे, बुडन गाडेकर, सरचिटणीस-़अनिल मावळे, कोषाध्यक्ष-पुâलचंद सहदेव मौर्य, कार्यवाहक:एजाज भाई, सहसंघटक-रमेश समुद्रे, समीर खान, सैय्यद जमीर जेके, तुषार हांडे, अर्जून घुगे, (महानगर अध्यक्ष):प्रशांत त़ु पळसपगार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news