मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार बाळापूर – शेगाव रोडवरील घटना
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला.
बाळापूर :- भरधाव वेगात चालत असलेल्या मालवाहू वाहनाने पाठीमागून दोन दुचाकींना जबर धडक दिली. अपघातातील दोन वाहने पाच फूट खोल असलेल्या नाल्यात कोसळली तर एक वाहन रोडवर पडले होते.
जखमींमध्ये २२ वर्षीय व २६ वर्षीय युवकाचा समावेश असून दोघेही सख्खे चुलत भाऊ आहेत. तर मृतक दोघेही साडूभाऊ असल्याची माहिती मिळाली आहे.
ही घटना आज (ता.३० ऑगस्ट) रोजी बाळापूर शेगाव रोडवर दुपारच्या सुमारास घडली.प्रवीण नेमाडे (वय ४५ वर्ष,रा.डोंगरगाव) प्रमोद चोपडे. रा.अकोली,ता.संग्रामपूर) अशी मृतकांची नावे आहेत.तर ज्ञानेश्वर रोही, व राहुल रोही (दोघेही रा.येवता ता.रिसोड) अशी जखमींची नावे आहेत.जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.अपघातातील मालवाहू वाहनाचा चालक फरार आहे.
भरधाव वेगात मालवाहू वाहन शेगाव वरून बाळापूर कडे येत असताना पाठीमागून दोन दुचाकींना जबर धडक दिल्याने तिन्ही वाहने पाच फूट नाल्यात फेकल्या गेली.या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागीच ठार झाले तर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे जण रोडच्या कडेला असलेल्या दरीत फेकल्या गेले.नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य राबविले.दोघे जण गंभीर जखमी अस्थेत पडलेले होते. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.घटनेची माहिती मिळताच बाळापूर ठाणेदार अनिल जुमळे यांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळी धाव घेतली.रोडवरील वाहतूक मोकळी केली.अपघातातील मृतक व जखमी हे शेगाव वरून बाळापूर कडे येत असल्याची माहिती मिळाली.या संदर्भात बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
प्रतिनिधी गजानन सुरजुसे बाळापुर अकोला