डाबकी रोड पोलीसांची धडक कारवाई, मोटार सायकल सह चोरटयांना अटक 

डाबकी रोड पोलीसांची धडक कारवाई, मोटार सायकल सह चोरटयांना अटक 

डाबकी रोड पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई मुद्देमाला सह आरो आरोपींना अटक करून.

६ मोटरसायकली जप्त करुन ३ लाख तीस हजार रुपयाचा त्यांच्याकडून मुददेमाल हस्तगत

प्राप्त माहिती अनुसार फिर्यादी राजेंद्र वसंतराव मुंगीकर वय ४४ वर्षे रा. लक्ष्मी नगर, डाबकी रोड यांनी पोलीस स्टेशन डाबकी रोड येथे दि १४/ऑगस्ट रोजी रिपोर्ट दिला दिनांक ११ ऑगस्ट रोजी फाटे ज्वेलर्स डाबकी रोड अकोला येथे त्यांची मोटर सायकल क्रमांक एमएच ३० बीक्यू ५३८३ अंदाजे किंमत ६०,०००/ रु.ची उभी केली असता ती कुणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याच्या फिर्यादी यांचे तक्रारीवरून दाबकी रोड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून विविध कलमांचे गुन्हे दाखल करून तपासात करण्यात आला.

गुन्हयाचे तपासादरम्यान गुप्तबातमीदार यांचे कडून प्राप्त माहितीनुसार वरीष्ठांचे मार्गदर्शनाखाली दाबकी रोड पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे, उप पोलीस निरीक्षक संभाजी हिवाळे सोबत पो स्टे चे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार अशांनी डाबकी रोड येथे संशयास्पद रित्या फिरणारे दोन इसम नामे अक्षय संजय तराळे व शुभम विजय अंबीलवादे दोन्ही रा. शेगाव यांना ताब्यात घेवून विचारपूस केली असता त्यांनी मोटर सायकल चोरी केल्याचे सांगितल्याने त्यांना अटक कारवाई करून त्यांचा पीसीआर घेवून विचारपूस केली असता, त्यांचे कडून पोलीस स्टेशन डाबकी रोड येथील दाखल विविध कलम वे भादंवि चे गुन्हयातील तीन मोटर सायकल तसेच त्यांनी पोलीस स्टेशन बाळापूर येथील हददीतून चोरी केलेली एक स्प्लेंडर मोटर सायकल, गुन्हा करणेकामी वापरलेल्या एकूण दोन मोटर सायकल व आरोपीकडून ६ मोटर सायकल व दोन मोबाईल अंदाजे किंमत तीन लाख तीस हजार रुपये र मुद्देमाल आरोपीतांकडून हस्तगत करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे व डाबकी रोड पोलीस स्टेशन तपास पथकातील पोलीस अंमलदार करीत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधिक्षक

संदीप घुगे , अपर पोलीस अधिक्षक अभय डोंगरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांचे मार्गदर्शनाखाली डाबकी रोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर जुनघरे पोलीस उपनिरीक्षक संभाजी हिवाळे, पोलीस कॉन्स्टेबल सुनिल टोपकर, दिपक तायडे असद खान, राजेश ठाकूर, नापोका प्रविण इंगळे, पोकों मंगेश गिते, मंगेश इंगळे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news