महामार्गावर ट्रकच्या धडकेत कारचा चुराडा सुदैवाने हानी टळली!
बोरगाव मंजू
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाळंबी नजीक मालवाहू ट्रक कन्टेनरच्या धडकेत कारचा समोरच्या भागाचा चुराडा झाला,हि घटना गुरुवारी सकाळी दरम्यान घडली,
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बोरगाव मंजू कडून कार क्रमांक एम एच ए झेड 3481 हि मुर्तिजापूर कडे जात होती तर मालवाहू ट्रक कन्टेनर क्रमांक आर जे 04. जी बी 6041 मुर्तिजापूर कडून बोरगाव मंजू कडे जात होता दरम्यान या दोन्ही वाहनात समोरासमोर अपघात झाला, तर कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला, सुदैवाने कारमधील चालक सुखरूप बाहेर पडला, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार मनोज केदारे हेडकॉन्स्टेबल कमलेश धर्माधिकारी, नितीन पाटील सह पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला नेमका अपघात कसा झाला हे मात्र समजू शकले नाही पुढील तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत