अखेर सिटी कोतवाली चौकासमोरील माजी नगरसेवकांचे नाल्यावरील अतिक्रमण काढले!
सदर अतिक्रमण पडल्यानंतर याची डिमांड कोणाकडून वसूल करणार!
अकोला महानगरपालिकेतील सिटी कोतवाली चौकातील नाल्यावर माजी नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले होते. गेल्या कित्येक वर्षापासून हे अतिक्रमण तसेच असल्यामुळे या या नाण्यातील पाणी जाण्यास अडथळा निर्माण होतो . तसेच रहदारी सुद्धा निर्माण होत होता. आज सकाळी भल्या पहाटे सहा वाजता सदर अतिक्रमणचा पोलीस बंदोबस्तात पाडण्यात आले.
विषेश म्हणजे सदर अतिक्रमण कोणाचे ? याबाबत सहाय्यक नगर रचनाकार राजेंद्र टापरे यांना सदर अतिक्रमण कोणाचे आहे हे विचारले असता त्यांनी सदर माजी नगरसेवकांचे नाव सांगण्यात नकार दिला त्यामुळे इथे सुद्धा खिचडी शिजत असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. शहरातील मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी तसेच नगरसेवकांचे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण असून ते सुद्धा पाडण्याची मागणी आता सामान्य नागरिकांकडून होत आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार आजच्या कार्यवाहीचे आदेश आयुक्त तथा प्रशासक यांनी दिल्याने कालपासुन सहा.उप आयुक्त,सहा.अतिक्रमण अधिकारी यांचे धाबे दणाणले होते.यावर रात्री मनपा आवारात चर्चा सुरू होती. इकडे आड तिकडे विहीर अशी गत झाल्याने महानगरपालिका अधिकार्यांची गोची झाली असल्याचे कळते.प्रत्यक्ष एका माजी नगर सेवका व्यतिरिक्त कोणत्याही नगर सेवकाने विरोध केला नाही मात्र कार्यवाही केली तर पाहून घेण्याचा दम दिला असल्याची माहिती आहे. मरता क्या नही करता प्रमाणे मजबुरीत आजची कार्यवाही करण्यात आल्याने सिटी कोतवाली चौकाने मोकळा श्वास मात्र घेतला.शासनाच्या नियमानुसार कोणत्याही राजकीय पुढा-र्याने शासकीय जागेवर अतिक्रमण केल्यास निवडणूक आयोगाच्या दंडाचे पात्र असतात परंतु आयुक्त अश्या राजकीय नेत्यावर कार्यवाही करणार का? सदर बिल्डिंगची पाडल्यानंतर याची डिमांड कुणा जवळून वसूल करणार वृक्ष असा प्रश्न आता सामान्य नागरिकांना पडला आहे.या निमित्ताने प्रश्न उपस्थित होत आहे. आजच्या कार्यवाहित सहा.उप आयुक्त देवकते, नगर रचनाचे टापरे,सहा.अतिक्रमण अधिकारी चंद्रशेखर इंगळे प्रविण मिश्रा व अतिक्रमण विभागातील कर्मचारी तथा अभिकर्ता चे कर्मचार्यांनी सहभाग घेत धडाकेबाज कार्यवाही केली आहे.