रा से यो चे ऋणानुबंध रक्षाबंधन पोलीस बांधवांसोबत
दहीहंडा : प्रतिनिधी दीपक भांडे
दहीहांडा – स्थानिक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती द्वारा सलग्नित सरस्वती कला महाविद्यालय दहीहांडा ता जि अकोला राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी आणि ऋणानुबंध रक्षाबंधन कार्यक्रम दिनांक 31/08/2023 रोजी अतिउत्साहात साजरा करण्यात आला दहीहांडा पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत सर्व पोलीस कर्मचारी हे आपली ड्युटी करण्यासाठी समाजाची सेवा करण्यासाठी अहोरात्र परिश्रम करत असतात आणि भारतामध्ये असणारे सर्व सणसमारंभ त्योहार हे सर्व पोलीस कर्मचारी ड्युटीवर असताना सुखरूप होतात ज्यामुळे समाजात एकता शांतता अखंडता निर्माण होण्यास मदत होते त्यामुळेच सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सुद्धा या रक्षाबंधनाच्या पावनपर्वामध्ये सामील होता आलं पाहिजे म्हणून रक्षाबंधन या भाऊ बहिणीच्या सणानिमित्त ते समाजासाठी ज्या परिश्रमाने सेवा देत आहेत त्याचे ऋण फेडण्यासाठी सामाजिक बांधिलकीची जाण म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन स्वतःची व समाजातील सर्व तरुण मुली महिला भगिनींची सुरक्षा करण्याची जणू हमीच घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांच्या ऋणातून थोडीशी उपराई होण्यासाठी सर्वांना राख्या बांधल्या दहीहांडा पोलीस स्टेशन मधील पोलीस निरीक्षक श्री सेवानंद वानखडे साहेब, श्री शरद सांगळे, श्री प्रकाश महाजन, श्री रामेश्वर भगत, श्री प्रवीण वाकोडे, श्री निलेश देशमुख, श्री निलेश गावंडे उपस्थित होते महाविद्यालयातील
प्रा .डॉ. गणेश पोटे, कार्यक्रम अधिकारी रा. से. यो. प्रा डॉ. योगेश वडतकर, सहकार्यक्रम अधिकारी रा.से.यो. उपस्थित होते या कार्यक्रमांतर्गत सर्व पोलीस कर्मचारी खूप आनंदी होते सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी आलेल्या विद्यार्थिनींना चॉकलेट व ओवाळणी दिली यावेळी महाविद्यालयाच्या मीनल पखाली, तृप्ती शिरसाट, मेघा शिरसाट, समीक्षा आठवले, राधा काकड इत्यादी विद्यार्थिनी उपस्थित.