शिंदे सरकारचं करायचं काय खाली मुंडके वरती पाय अशा घोषणा देत उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे लोखंडी पुलावर रस्ता रोको आंदोलन
जालना येथील घटने विरोधात शिंदे सरकारचा विरोध करीत उबाठा गटाचे लोखंडी पुलावर रस्ता रोको आंदोलन
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावात आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे आमरण उपोषण कर्त्यांनवर ल शिंदे सरकारने लाठीचार्ज केल्याचा आरोप करीत आज उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी लोखंडी पूलावर रस्ता रोको आंदोलन केले.
उद्धव ठाकरे ज्या वेळेस सरकारमध्ये त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याकरिता सरकारच्या मागे लागले होते मात्र आता शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मराठा समाजावर आंदोलनात लाठीचार्ज करण्यात येत असून लोकशाही संपून हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप करीत उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात सिटी कोतवाली समोरील दगडी लोखंडी पूल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.