वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने राज्य सरकारचा पुतळा जाळून रस्ता रोको आंदोलन!
जालना येथील घटने विरोधात शिंदे सरकारचा विरोध करीत राधाकृष्ण टॉकीज येथे पुतळा जाळून रस्ता रोको आंदोलन!
जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी या गावात आरक्षण संदर्भात मराठा समाजाचे आमरण उपोषण कर्त्यांनवर ल शिंदे सरकारने लाठीचार्ज केल्याचा आरोप करीत आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुतळा जाळून रस्ता रोको आंदोलन केले
शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर मराठा समाजावर आंदोलनात लाठीचार्ज करण्यात येत असून लोकशाही संपून हुकूमशाही सुरू असल्याचा आरोप करीत
गरीब मराठ्यांना नोकरीसाठी आरक्षण द्या अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या युवा संघटनेतर्फे करण्यात आली
काँग्रेस. राष्ट्रवादी. भाजप. आमदार हे मराठा आरक्षणासाठी दुर्लक्ष करीत आहे. राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या आमदारकी व खासदार पदाचा राजीनामा द्यावा. सत्तेतून बाहेर पडून मराठा समाजा सोबत या तसेच या सरकारची साथ सोडून आपण वंचित आघाडी सोबत या यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगण्यात आले.