मराठा समाजातील आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकान्यांवर तात्काळ कारवाई करा!

मराठा समाजातील आंदोलकांवर अमानुष लाठीचार्ज करणाऱ्या पोलीस अधिकान्यांवर तात्काळ कारवाई करा!

अकोला जिल्हा व महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन!

जालन्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी थे मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाचा दर्जा देण्यात यावा व अन्य मागणीसाठी सुरू असलेल्या उपषोणाला पाठिंबा देण्यासाठी धुळे-सोलापूर महामार्गावर आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सदर आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधारा, हवेत गोळीबार करत त्यांना अमानुष पणे लाठीचार्ज केला. या लाठीचार्ज मध्ये महिला, मुले जख्मी झाले आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या या आंदोलकांवर लाठीचार्ज, बळप्रयोग करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले. यावेळी माजी आमदार बबनराव चौधरी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव अमानकर. प्रशांत पाटील वानखडे अध्यक्ष महानगर काँग्रेस कमिटी. साजिद खान पठाण विरोधी पक्ष नेता महानगरपालिका. मोहम्मद इरफान माजी नगरसेवक. रवी शिंदे. रवी तायडे. आधी अकोला शहर काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news